Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

Pune Crime : आंदेकर टोळीतील सराइताला घर भाड्याने देणे भोवले

आंदेकर टोळीतील सराइताला घर भाड्याने देणे भोवले

घरमालकीण महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Crime : माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी धनकवडीतील आंबेगाव पठार येथे खोली भाड्याने घेऊन प्रतिस्पर्धी टोळीतील निकटवर्तीयांवर पाळत ठेवणाऱ्या कृष्णा काळे याला भारती विद्यापीठ पोलिसांनी नुकतीच अटक केली. काळेला घर भाड्याने देऊन त्याबाबत पोलिसांना माहिती न दिल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस कर्मचारी सारंग कर्डेकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३८ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

येरवडा कॉमरझोन आयटी पार्कमध्ये आग – सविस्तर बातमी 

आरोपी महिला आंबेगाव पठार येथील गजानन कॉलनीत राहायला आहे. तिने घर भाड्याने देण्यापूर्वी माहिती पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक होते. तसेच भाडेकरार करणेही गरजेचे होते. मात्र, तसे न करता भाडेकरूंची नोंदणी न करता तिने आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी कारवाईचे आदेश विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी दिला आहे.

आंबेगाव पठार येथील पांडुरंगनगर भागात महिलेची चाळ आहे. या चाळीतील खोली ३० ऑगस्ट रोजी आंदेकर टोळीतील सराइत दत्ता बाळु काळे याला पाच हजार रुपये अनामत रक्कम घेऊन भाड्याने देण्यात आली. या खोलीचे दरमहा तीन हजार रुपये भाडे ठरले आहे. खोली भाड्याने दिल्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारचा भाडे करारनामा केला नाही. त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र, तसेच अन्य कागदपत्रे घेतली नाही. याबाबतची माहिती महिलेने पोलिसांना दिली नाही. दत्ता काळे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने आंबेगाव पठार भागात खोली भाड्याने घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी घर मालकिणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×