Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

पोलिसांनी समन्वयातून बंदाेबस्त पार पडला- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

गणेशोत्सव शांततेत, पुणेकरांना धन्यवाद

marathinews24.com

पुणे – ‘गणेशोत्सवात सर्व मंडळांशी पोलिसांनी समन्वय साधून बंदाेबस्त पार पडला. विसर्जन मिरवणूक लवकर संपवावी, यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले नाही. मिरवणुकीत सहभागी मंडळांना समान वेळ मिळाला पाहिजे, अशी पोलिसांची भावना होती’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासकडून दिवसरात्र वैद्यकीय सेवा – सविस्तर बातमी

विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून ८ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता या प्रमुख मार्गांवरून मंडळे मार्गस्थ झाली. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास टिळक चौकातून शेवटचे मंडळ मार्गस्थ झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीचा बंदोबस्ताचा समारोप करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते.

ते म्हणाले, ‘ विसर्जन मिरवणूक सोहळा शांततेत पार पडला. शहर, तसेच परिसरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. प्राणप्रतिष्ठापना सोहळा ते विसर्जन सोहळ्या दरम्यान पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. गणेशोत्सव, तसे विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिसांनी मंडळांनी सुरुवातीपासून समन्वय ठेवला होता. समन्वय ठेवल्याने विसर्जन मिरवणूक सोहळा शांततेत पार पडला. मिरवणूक लवकर संपवावी, यासाठी पोलिसांंचे प्रयत्न नव्हते. सर्वांना समान वेळ मिळाला पाहिजे. काही ठराविक मंडळाला जास्त आणि काहींना कमी वेळ असे होऊ नये, यासाठी प्रयत्न केले’

विसर्जन मिरवणूक कार्यकर्त्यांच्या हाती

मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले. मानाचे मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्त्यावरील मिरवणूका रेंगाळल्या.रविरारी सायंकाळपर्यंत मिरवणूका सुरू होत्या. मानाची मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर विसर्जन मिरवणूक कार्यकर्त्यांच्या हाती गेली. पोलिसांनी मिरवणुका लवकर आटोपण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत.

विसर्जन सोहळा वेळ
मिरवणुक वेळ वेळ
२०१६ २८ तास ३० मिनिटे
२०१७ २८ तास ०५ मिनिटे
२०१८ २७ तास १५ मिनिटे
२०१९ २४ तास
२०२० कराेनामुळे मिरवणूक नाही

२०२१ करोनामुळे मिरवणूक नाही

२०२२ ३१ तास
२०२३ २८ तास ४० मिनिटे

२०२४ २८ तास ३० मिनिटे
२०२५ ३२ तास २६ मिनिटे

मानाची पाच मंडळे विसर्जन वेळ

मंडळाचे नाव मिरवणूक आगमन वेळ (बेलबाग चौक) विसर्जन वेळ मिरवणुकीसाठी लागलेला वेळ

श्री कसबा गणपती मंडळ दहा वाजून १२ मिनिटे तीन वाजून ४७ मिनिटे सहा तास १३ मिनिट

श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ अकरा वाजून १० मिनिटे चार वाजून दहा मिनिटे सहा तास ८ मिनिट

श्री गुरुजी तालीम मंडळ अकरा वाजून ४६ मिनिटे चार वाजून ३४ मिनिटे पाच तास ४४ मिनिट

श्री तुळशीबाग मंडळ एक वाजून १२ मिनिटे चार वाजून ५८ मिनिटे पाच तास ३५ मिनिट

केसरी वाडा गणपती एक वाजून २६ मिनिटे पाच वाजून ३८ मिनिटे पाच तास १९ मिनिट

रात्रीची मानाची पाच मंडळे
मंडळाचे नाव मिरवणूक आगमन वेळ (बेलबाग चौक) विसर्जन वेळ मिरवणुकीसाठी लागलेला वेळ

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चार वाजून ३० मिनिटे नऊ वाजून २३ मिनिटे पाच तास

हुतात्मा बाबू गेणू मंडळ आठ वाजून ५१ मिनिटे दोन वाजून २५ मिनिटे सहा तास २४ मिनिटे

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती अकरा वाजता दोन वाजून ४० मिनिटे चार तास ४० मिनिटे

अखिल मंडई मंडळ अकरा वाजून ४६ मिनिटे चार वाजून २८ मिनिटे पाच तास चार मिनिटे

जिलब्या मारुती मंडळ आठ वाजून आठ मिनिटे तीन वाजून ४७ मिनिटे सात तास ४७ मिनिटे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×