Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासकडून दिवसरात्र वैद्यकीय सेवा

पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासकडून दिवसरात्र वैद्यकीय सेवा

७२२ गणेश भक्तांवर केले उपचार

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यापार्श्वभूमीवर यंदाही पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासतर्फे दिवस रात्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. यामुळे ७२२ गणेश भक्तांना तातडीचे वैद्यकीय उपचार मिळाले आहेत. तर ४८ रुग्णांना पुढील उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल केले. बेलबाग चौक, आप्पा बळवंत चौक, नारायण पेठ पोलीस चौकी, लक्ष्मी रोड (गोखले हॉलजवळ),एस.पी. कॉलेज चौक, पूरम चौक याठिकाणी सेवा देण्यात आली. त्यासाठी१२४ डॉक्टर्स आणि मोठा स्वयंसेवक वर्ग तैनात होता.

गणेश विसर्जन मिरवणुकीत भाविकांची केली सेवा – सविस्तर बातमी 

रुग्णांमध्ये ५२ पोलीस बांधवांचाही समावेश होता. वैद्यकीय सेवेत १२४ डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन तज्ञांचा समावेश होता. उपक्रमाचे नेतृत्व प्रा. डॉ. मिलिंद भोई, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. नंदकिशोर बोरसे यांच्यासह सर्जनांच्या टीमने केले. तसेच शेठ ताराचंद हॉस्पिटल, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, मदरहुड हॉस्पिटल, माय माऊली ॲम्ब्युलन्स, ओम ॲम्ब्युलन्स, जीवनरक्षा ॲम्ब्युलन्स तसेच डॉ. नितीन बोरा, डॉ. प्रीती व्हिक्टर, रूपाली मगर, सदाशिव कुंदेन, जयशंकर माने, डॉ. उदय झेंडे यांनी विशेष सहकार्य केले.

या घटनामुळे भक्तांना झाला त्रास

उष्णतेमुळे घाम येऊन, डीहायड्रेशन, चक्कर येणे, जास्त काळ डीजेच्या आवाजाजवळ उभे राहिल्याने रक्तदाब वाढणे, कान दुखणे, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना कानदुखी, रंगीत धूर, भस्ममुळे खोकला, दम लागणे, गुदमरणे, ढोल-ताशा वाजवताना अपघात, डीजेजवळ डान्समुळे कान दुखणे, बहिरेपणा, ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन जखमी, चेंगराचेंगरीतून झालेल्या दुखापती झाल्याच्या घटना घडल्या.

विसर्जन मिरवणुकीत किरकोळ अपघात घटना

लक्ष्मी रोडवर मिरवणुकीत सहभागी असलेल्या ट्रॅक्टर चालकाला फीट आली. मात्र त्याला तातडीचे उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. दुसऱ्या घटनेत महिला पोलिस कॉन्स्टेबलला चक्कर येऊन त्या खाली कोसळल्या होत्या. रुग्णवाहिकेतून त्यांना शेठ ताराचंद हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्या प्रकृतीची अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे माहिती घेतली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×