Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

रिक्षातून महिला प्रवाशाचा ऐवज चोरीला

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

येरवड्यातील गुंजन चौकातील घटना

marathinews24.com

पुणे – रिक्षातून खाली उतरून ट्रव्हलची वाट पाहत थांबलेल्या एका दाम्पत्याकडील ६७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना १५ जुलैला संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील गुंजण चौकात घडली आहे. याप्रकरणी जळगावमधील तरूणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण मूळचा जळगावचा असून, १५ जुलैला तो पत्नीसह गावी जाण्यासाठी गुंजन चौकात आरामदायी बसची वाट पाहत थांबला होता. रिक्षातून उतरल्यानंतर गाडीची वाट पाहत असतानाच चोरट्याने तरूणाच्या पत्नीची पर्स चोरून नेली. त्यामध्ये दोन हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल असा ६७ हजारांचा ऐवज असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अमलदार शिंदे तपास करीत आहेत.

पीएमपीएल बसप्रवासात महिलेचे दागिने चोरीला

पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी ५५ वर्षीय महिलेचे ४६ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १७ जुलैला दुपारी दोनच्या सुमारास संत गाडगे महाराज शाळा कोंढवा बुद्रूक ते सोमची चौक प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी कोंढव्यात राहणार्‍या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोंढव्यात राहायला असून, १७ जुलैला दुपारी दोनच्या सुमारास संत गाडगे महाराज शाळा कोंढवा बुद्रूक ते सोमची चौक प्रवास करीत होती. त्यावेळी बसमधील गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेकडील ४६ हजारांचे दागिने चोरून नेले. काही अंतरावर महिलेला दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने कोंढवा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण तपास करीत आहेत.

सायबर चोरट्यांकडून तरूणाला पावणेचार लाखांचा गंडा

क्रेडीट कार्ड विभागातील असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल पावणे चार लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १७ जूनला विश्रामबाग परिसरात घडली आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय तरूणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३४ वर्षीय तरूण विश्रामबाग परिसरात राहायला असून, १७ जुनला सायबर चोरट्यांनी त्याला फोन केला. क्रेडीट कार्ड विभागातून बोलत असल्याची बतावणी करीत त्याचा विश्वास संपादित केला. त्यानंतर मोबाइलवर लिंक पाठवून ओटीपी शेअर करण्यास भाग पाडले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरूणाच्या बँक खात्यातून ३ लाख ८३ हजार रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरूण घोडके तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×