‘हिट अॅण्ड रन घटनांनी पुणेकर भयभीत, चालकांचा बेदरकारपणा पादचार्यांच्या जीवावर
Marathinews24.com
पुणे – बेशिस्त वाहनचालकांकडून बेदरकारपणे वाहने दामटल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवाला मुकावे लागत आहे. प्रामुख्याने सकाळच्यावेळी व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या जेष्ठ नागरिकांसह रस्त्याने पायी जाणार्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. धुमस्टाईल ड्रायव्हिंगमुळे मागील काही महिन्यात विविध भागात झालेल्या अपघात ६२ जणांना जीव गमवावा लागला आहे. काहीही चुक नसताना संबंधितांना प्राणास मुकावे लागले आहे. हिट अॅण्ड रनच्या घटनांमुळे पुणेकर भरभीत झाले आहेत. दरम्यान, बेशिस्तांविरूद्ध वाहतूक विभागाकडून वारंवार दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, त्यानंतरही अपघातांचे प्रमाण कमी होत नाही.
वाद सोडविणार्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
वाहतूक निमयांचे उल्लंघन करीत वाहने चालविल्यामुळे अपघातांच्या संख्येत भर पडल्याचे दिसून आले आहे. मध्यवर्ती शहरासह उपनगरात बेशिस्त दुचाकीस्वार यांसह मोटार चालकांकडून अतिवेगाने वाहन चालविल्याने अपघात घडले आहेत. काही दिवसांपुर्वी वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात ३ पादचार्यांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये दोन ज्येष्ठ नागरकिांचा समावेश आहे़ कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर उंड्री परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत सुजीतकुमार िंसह (वय ४७, रा उंड्री) यांचा मृत्यू झाला. तर डेक्कन परिसरातील बीएमसीसी रस्त्यावर वाहनाच्या धडकेत अरुण जोशी (वय ६०, रा राजेंद्रनगर) हे ठार झाले. येरवडा परसिरात रस्ता ओलांडणार्या अमीना करीम मेघानी (वय ६०, रा शास्त्रीनगर, येरवडा) यांचाही वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता.
रस्ता मोकळा अन वाहनांचा वाढलेला वेग
वाहनांच्या गर्दीमुळे शहरात अनेकदा चालकांना वेगाने गाडी चालविता येत नाही. मात्र, सकाळी किंवा रात्रीच्या सुमारास बहुतांश रस्त्यांवर तुरळक वाहने असतात. त्यामुळे आजूबाजूचे रस्ते मोकळे असल्याची संधी साधत चालकांकडून वाहनांचा वेग वाढला जातो. अशावेळी वेगामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून ‘पादचार्यांना धडक देऊन पसार होण्याच्या घटना घडत आहेत. बहुतांश अपघात पहाटेच्या सुमारास मध्यरात्री झाले असून, अतिवेगामुळे अपघात घडल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या बहुतांश अपघातात वाहन चालकांची चूक असते. तसेच काही अपघातात पादचार्यांची चूक असते, ’ असे निरीक्षण पुणे वाहतूक शाखेतील अधिकार्यांनी नोंदविले आहे.
ब्लॅक स्पॉटची निश्चीती
पुण्यात ज्याठिकाणी सातत्याने अपघात घडतात अशी २४ अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) वाहतूक पोलिसांनी निश्चीत केली आहेत. त्या ठिकाणांवरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस, जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधकिरणाकडून दीर्घकालीन कृती आरखडा तयार केला जाणार आहे. त्यानुसार संबंधित भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, पादचार्यांसह वाहनांना धडक देऊन पसार झालेल्या चालकांना शोधण्यासाठी सीसीटीव्ही चित्रीकरणाची मदत घेतली जाते.
‘पादचारी सिग्नल’च्या वेळेत वाढ
नगर रस्ता, सोलापूर रस्त्यावर वाहतूक सुधारणा केल्यानंतर परिसरातील वाहतुकीचा वेग वाढला आहे नगर रस्ता रुंद असून पादचार्यांना रस्ता सुरक्षतिपणे ओलांडता यावा, यासाठी वाहतूक पोलिसांनी पादचारी सिग्नलची वेळ वाढविला आहे पादचारी सिग्नलसाठी पूर्वी २० सेकंद वेळ होती. आता त्या वेळेत वाढ करुन ३० सेकंद करण्यात आली आहे.
२०२४ मध्ये अपघातात ३४५ जण ठार
पुणे शहर परसिरात २०२४ मध्ये तब्बल ३३४ प्राणांतिक अपघात घडले आहेत. अपघातात ३४५ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीररित्या जखमी झाले. त्यामुळे संबंधितांपैकी काहीजणांना कायमस्वरुपीचे अंपगत्व आले आहे. तसेच २०२५ मध्ये फेबु्रवारीपर्यंत पुण्यात ५९ अपघात झाले असून, त्यामध्ये ६२ जण ठार झाले आहेत. दरम्यान, अपघातात मृत्युमुखी पडणार्यांमध्ये सर्वाधिक संख्या दुचाकीस्वारांची असल्याची नोंद पुणे वाहतूक विभागाकडे आहे.