Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत समावेश

स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत समावेश

राज्यभर २२ जुलै रोजी साजरी होणार स्व. अजित पवार यांची जयंती

marathinews24.com

मुंबई – राज्य शासनाने स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत केला आहे. यासंदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज जारी केले आहे.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती नगरीत प्रशासनाच्यावतीने स्वागत – सविस्तर बातमी 

परिपत्रकानुसार, स्व. अजित अनंतराव पवार यांची जयंती दरवर्षी २२ जुलै रोजी राज्यभर शासकीय स्तरावर साजरी करण्यात येणार आहे. त्यानुसार मंत्रालय तसेच राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल.

हा कार्यक्रम राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांबरोबरच शाळा आणि महाविद्यालयांमध्येही आयोजित करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालये व संस्थांमध्ये कार्यक्रमाचे नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

स्व. अजित अनंतराव पवार यांनी सार्वजनिक जीवनात केलेल्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने त्यांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश करण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×