Breking News
फ्लॅटमध्ये आग, सिलेंडरचा स्फोट, कुटूंब बचावलेपुण्यात ज्येष्ठाच्‍या २२ कोटींच्‍या फसवणूक प्रकरणात आणखी चौघांना बेड्यासायबर चोरट्यांची कमाल; निवृत्त अधिकाऱ्याला पावणे सात कोटींना गंडापुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यातधक्कादायक; वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळलेसरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीरराज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यातपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुण्यात अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांंविरुद्ध कारवाईच्या जाळ्यात

पुणे पोलिसांच्या नवीन इमारतीसाठी अजित पवार यांचा पाठपुरावा

पुणे पोलिसांच्या नवीन इमारतीसाठी अजित पवार यांचा पाठपुरावा

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम पूर्ण करण्यात येणार

marathinews24.com

पुणे – पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या दोन वर्षांत सात मजली अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील नवीन इमारत आधुनिक स्वरुपात बांधण्यात यावी, असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पवार यांनी नवीन इमारतीसाठी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन इमारत पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करू, असे आश्वासन दिले होते.

महाराष्ट्राचा अत्यंत अभ्यासू आणि कर्तबगार नेता हरपला – सविस्तर बातमी 

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. ‘लँडमार्क डिझाइन ग्रुप’ या कंपनीच्या माध्यमातून बांधकाम करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या आवारातील बैठी कार्यालये पाडण्याचे काम पूर्ण झाले असून, मुख्य इमारत अद्याप पाडण्यात आली नाही. पुणे पोलीस आयुक्तालयाची प्रस्तावित इमारत अत्याधुनिक असावी, यासाठी पवार यांनी पाठपुरावा केला होता. नवीन इमारतीचे संकल्प चित्र त्यांनी पाहिले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीकडून पोलीस दलातील साधन सुविधांसाठी पवार यांनी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला होता. शहरातील घडामोडींवर त्यांचे बारकाईने लक्ष असायचे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×