Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाकरिता पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

अधिकारी होण्याच्या इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

marathinews24.com

पुणे – भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना ‘सीडीएस’ या परीक्षेच्या तयारीकरिता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे १९ जानेवारी ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सीडीएस’ अभ्यासक्रम क्रमांक ६६ चे आयोजन करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेण्याकरिता जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे १८ जानेवारी रोजीपर्यंत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सिंधुताईंचे कार्य वटवृक्षांसारखे आहे; ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभूणे यांचे प्रतिपादन – सविस्तर बातमी

मुलाखतीस येतांना सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सीडीएस-६६ या अभ्यासक्रमाकरिता असलेले प्रवेशपत्र किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेल्या प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची मुदित प्रत तीन प्रतीत भरुन सोबत घेऊन यावी. अभ्यासक्रम कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे.

या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याकरिता पुढीलपैकी कोणतीही एक पात्रता इच्छुक उमेदवारांनी धारण केलेली असावी. उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या उमेदवार परीक्षेकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या training.pctcnashik@gmail.com ईमेल व ०२५३-२४५१०३२ दुरध्वनी क्रमांक किंवा ९१५६०७३३०६ व्हॉटसअप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×