Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती सदस्यांची नियुक्ती

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती सदस्यांची नियुक्ती

त्रिभाषा धोरण ठरविण्यासाठी शिक्षणतज्ज्ञांची समिती गठित

marathinews24.com

मुंबई – राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३० जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने समिती सदस्यांची नियुक्ती करण्याचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून आतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी – सविस्तर बातमी 

या समितीमध्ये डॉ. सदानंद मोरे, (माजी अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती), डॉ. वामन केंद्रे, (संचालक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD)), डॉ. अपर्णा मॉरिस, (शिक्षणतज्ज्ञ, पुणे), श्रीमती सोनाली कुलकर्णी जोशी, (भाषा विज्ञान प्रमुख, डेक्कन कॉलेज, पुणे), डॉ. मधुश्री सावजी, (शिक्षणतज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर), डॉ. भूषण शुक्ल, (बालमानसतज्ज्ञ, पुणे) हे सदस्य तर, संजय यादव, (राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई) हे सदस्य सचिव असतील.

उपरोक्त समिती दिनांक ३० जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यकक्षेप्रमाणे कामकाज करेल तसेच त्रिभाषा धोरणासंदर्भातील अहवाल तीन महिन्यांच्या मुदतीत शासनास सादर करेल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×