Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

लष्कर, कोंढवा परिसरात घरफोडी करणार्‍या सराईतांना अटक

सराईतांना लष्कर पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – शहरातील लष्कर, कोंढवा परिसरात घरफोडी करणार्‍या सराईतांना लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील ऐवज जप्त केला आहे.आर्यन अजय माने ऊर्फ मॉन्टी ( वय २१ रा. खुटवड चौक, हरपळे वस्ती, फुरसुंगी) विशाल मारुती आचार्य (वय २५ रा. आनंद नगर रामटेकडी) ओमकार सुरेश गोसावी ( वय २२ रा. मुक्ताई रेसीडन्सी, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपीपैकी आर्यन अजय माने ऊर्फ मॉन्टी आणि ओमकार सुरेश गोसावी हे सराईत गुन्हेगार आहेत.त्यांच्यावर हडपसर,वानवडी, लोणीकंद ठाण्यातंर्गत परिसरात चोरीसह घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

फुरसुंगीत वाहनांची तोडफोड, तिघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

कॅम्पमधील यूनियन बँक ऑफ इंडियासह ईस्ट्रीट यूनियन बँकेशेजारी कार्यालयात १५ जुलैला घरफोडीचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपास पथकातील पोलीस अंमलदार लोकेश कदम व सागर हराळ यांनी तांत्रिक विश्लेषण करुन आरोपींनी वापरलेले वाहन निष्पन्न केले. त्यानंतर पथकाने रामटेकडी, हडपसरख् फुरसुंगी परिसरात वाहनासह आरोपींचा शोध घेतला. आरोपी हे त्याच्याकडील वाहन घेउन रामटेकडी परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तिघांना ताब्यात घेत अटक केली.

आरोपींनी लष्कर, कोंढवा परिसरात घरफोडी चोरी केल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडुन लष्कर गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत जप्त केला आहे. तसेच त्यांनी कोंढवा परिसरातही गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे. ही कामगिरी उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी अतुलकुमार नवघीरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, गिरीषकुमार दिघावकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) प्रदिप पवार, एपीआय विशाल दांडगे, उपनिरिक्षक राहुल घाडगे, महेश कदम, अतुल मेंगे, सोमनाथ बनसोडे, रमेश चौधर, प्रविण गायकवाड, प्रमोद गायकवाड, अमोल लोकेश कदम, सागर हराळ अमोल कोडीलकर यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×