एटीएमकार्ड च्या माध्यमातून दोन महिलांना ९० हजारांचा ऑनलाईन गंडा
marathinews24.com
पुणे – एटीएम मशीनमधून रक्कम निघत नसल्यामुळे हेल्पलाईनला फोन करणे दोन महिलांना महागात पडले आहे. याप्रकरणी आरोपीने महिलांचे पीनकोड घेउन त्यांच्या बँकखात्यातून ९० हजार रूपये काढून घेत फसवणूक केली आहे. ही घटना १८ एप्रिलला रात्री सातच्या सुमारास धायरीतील बेनकरवस्तीवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये घडली आहे. याप्रकरणी उषा विश्वासराव (वय ४९, रा. धायरी ) यांनी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेला २२ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार उषा विश्वासराव धायरीत राहायला असून, १८ एप्रिलला रात्री सातच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये रक्कम काढण्यासाठी गेली होती. मशीनमधून पैसे न आल्यामुळे त्यांनी आरोपीने लिहून ठेवलेल्या क्रमांकावर फोन केला. त्यावेळी आरोपीने त्यांना आज गुड फ्रायडे निमित्ताने सुटी असल्याची बतावणी केली. त्यानंतर त्यांच्या एटीएम कार्डचा गोपनीय क्रमांक विचारून घेतला. आरोपीने उषा यांच्या बँक खात्यातून ५० हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. त्यासोबत काही दिवसांपुर्वी आरोपीने अशाच प्रकारे एका महिलेची ४० हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे तपास करीत आहेत.