Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

नाहक बदनामी करणाऱ्या महिलेवर कारवाई करा; मला अडकवण्याचा प्रयत्न-आमदार चित्रा वाघ

नाहक बदनामी करणाऱ्या महिलेवर कारवाई करा; मला अडकवण्याचा प्रयत्न-आमदार चित्रा वाघ

पुणे पोलिस आयुक्तांकडे मागणी

marathinews24.com

पुणे – मी ज्या महिलेला कधी भेटले नाही, ती महिला माझ्यावर आरोप करून माझी बदनामी करत आहे. हा प्रकार मला बदनाम करण्याचा व अडकवण्याचा प्रयत्न आहे. यामागे नेमके कोण आहे, याचा शोध मी घेणार आहे, कोणालाही सोडणार नाही, असा इशारा भाजपच्या विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांनी दिला. त्यांनी माझी नाहक बदनामी करणाऱ्या महिलेवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणीही पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.

‘शांतता..पुणेकर वाचत आहेत’ उपक्रम विश्वविक्रम घडवणार – सविस्तर बातमी 

वाघोली येथील महिलेने चित्रा वाघ यांच्यावर आरोप करणारा व्हिडीओ तयार करून तो व्हायर केला आहे. मी नवऱ्यासोबत राहत नाही, चित्रा वाघ यांच्यामुळे माझा घटस्फोट झाला, असे आरोप त्या व्हिडीओमध्ये करण्यात आले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी मंगळवारी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेऊन संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. संबंधित महिलेला मी ओळखत नाही, मी तिला कधी पाहिले नाही. भाजप शहर पदाधिकारी हर्षदा फरांदे संबंधीत महिला भेटली होती. तिची तक्रार तिच्या नवर्या विरोधात आणि सासरच्या लोकांनी विरोधात होती. आम्ही तिला पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा नोंद करण्यास सांगितले.

माझ्यावरच आरोप केले असून, मी तिला कधीच सांगितले नाही की घटस्फोट घे. तरीही तिने माझ्यावर आरोप करून माझी बदनामी केली. अशा खोटारड्या बायकांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न मी सहन करणार नाही, यामागे कोण आहे, मी शोधणार आहे. मी कोणालाही सोडणार नाही, असा इशारा वाघ यांनी दिला. या अन्यायाविरोधात महिला आयोगाकडे जाणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, मला कुणाकडे जायची गरज नाही. माझ्यावरील अन्याय दूर करण्यास मी समर्थ आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×