Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघे अटकेत

वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघे अटकेत

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन पसार झालेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. आरोपींबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले. करण शिवाजी जमादार (वय १९, रा. वडगाव बुद्रुक), शुभम साधू चव्हाण (वय १९, रा. रियांश सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पत्रकारांच्या सुरक्षेसाठी काळजी घेऊ- पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी 

फिर्यादी महिलेचा मुलगा ४ सप्टेंबरला मित्रांबरोबर मोबाइलवर गेम खेळत होता. त्यावेळी आरोपी करण, शुभम आणि दोन अल्पवयीन साथीदार तेथे दुचाकीवरुन गेले. आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्यामुळे हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत होता.

पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले

तपास पथकातील पोलीस कर्मचारी मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना पसार आरोपी करण, शुभम आणि अल्पवयीन साथीदारांची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनांना ताब्यात घेतले. ही कामगिरी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक मिथुन परदेशी, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, संदीप आगळे, अवधूत जमदाडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×