श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्षे
marathinews24.com
पुणे – सध्याच्या काळात सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात वाढलेली गुन्हेगारी पाहता हे शहर भयमुक्त व्हावे, स्वच्छ पुणे, सुंदर पुणे शहर असावे अशी प्रार्थना माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी काली मातेकडे केली.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माणुसकीची दिवाळी – सविस्तर बातमी
बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या काली पूजा उत्सवात रविंद्र धंगेकर बोलत होते. यावेळी पुणे शहर सार्वजनिक काली पूजा कमिटीचे कमिटीचे सेक्रेटरी सुब्रतो मजुमदार, विनोद संतरा, अनुप माईती, पूनचंद्र दास, संकेत मजुमदार उपस्थित होते.
मागील २५ वर्षापासून हा उत्सव आपल्या भागात साजरा केला जात असून त्यात अनेक बंगाली बांधव सहभागी होत असतात. महाराष्ट्रात 45 वर्षापासून बंगाली बांधव सोन्याचे कारागीर म्हणून पुणे शहरात कार्यरत असून त्यांच्याशी आपला घरगुती संबंध आहे, असे धंगेकर यांनी नमूद केले. काली मातेवर श्रद्धा बाळगणाऱ्या बंगाली नागरिकांसाठी आवश्यक त्या उपलब्धता मिळवून देणे हे आपले कर्तव्य असून त्यांच्या भावनांचा आपण आदर करत असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.



















