Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आयोजित ४३ वे अखिल अधिवेशन २१ ऑगस्टला

दोन दिवसीय अधिवेशन सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत

marathinews24.com

पुणे – भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आयोजित ४३ वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन दि.२१ ते २२ ऑगस्ट कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. महालक्ष्मी मंगल कार्यालय (मित्रमंडळ, पर्वती) येथे हे दोन दिवसीय अधिवेशन सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार असून १२ संस्थांचा या अधिवेशनाच्या आयोजनात सहभाग आहे. देशभरातून नामवंत ज्योतिर्विद या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.या अधिवेशनात दोन्ही दिवशी ज्योतिष विषयक विषयांवर देशभरातील तज्ज्ञांची चर्चासत्रे, मार्गदर्शन, स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. भालचंद्र ज्योतिर्विद्यालयचे संस्थापक डॉ. चंद्रकांत शेवाळे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

पोलीस भरती करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; पोलीस भरतीला हिरवा कंदील – सविस्तर बातमी

अरुण हुपरीकर,डॉ.नीलेश कुलकर्णी हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता अधिवेशनाचे उद्घाटन उल्हास पाटकर, विजय जकातदार, अविनाश मग्गीरवार, राज कुंवर, नवनीत मानधनी, चंद्रकला जोशी, रोहित वर्मा, नवीनभाई शहा, व.दा.भट,उमेश कुलकर्णी, कैलास केंजळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. उल्हास पाटकर यांच्या अमृतमहोत्सवाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विजय जकातदार दांपत्याला चंद्रपुष्प पुरस्कार देण्यात येणार आहे.रमेश पलंगे यांना वास्तूमहर्षी पुरस्कार देण्यात येणार आहे.

२२ ऑगस्ट रोजी दुसऱ्या दिवशीच्या सत्राचे उद्घाटन डॉ. सुनीता पागे, डॉ. सीमा देशमुख, नाटेकर, मोहन दाते, सिद्धेश्वर मारटकर, मोहन फडके, शुभंगिनी पांगारकर, मधुसूदन घाणेकर, शशिकांत ओक, नितीन गोठी, चारुशीला कांबळे, सोपान बुडबाडकर, जानकी पाचारणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. याच दिवशी कै. शीलाताई पाचारणे स्मृती आदर्श ज्योतिष शिक्षिका पुरस्कार जयश्री बेलसरे यांना पुष्पा शेवाळे यांना शिक्षक रत्न पुरस्कार, चित्रकार ज्ञानेश सोनार यांना ग्रहांकित जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×