Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

राष्ट्रभूषण चौकात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार

दुचाकी घसरल्याने अपघातात तरूण ठार, एकजण जखमी

अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बळीराम साहेबराव चव्हाण (वय २१, रा. पांगरी, बदनापूर, जि. जालना) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत राम साहेबराव चव्हाण (वय २३) यांनी खडक पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चांदणी चौक-जांभुळवाडी व बकोरी रस्त्यांचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश-उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार बळीराम छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन गुरुवारी (११ सप्टेंबर) पाहटे चारच्या सुमारास निघाला होता. खडकमाळ आळी परिसरातील राष्ट्रभूषण चौकात भरधाव मोटारीने दुचाकीस्वार बळीराम याला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या बळीरामचा मृत्यू झाला. या प्रकरणी चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करत आहेत.

सदनिकेचे कुलूप तोडून दागिने लांबविले

सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना चतु:शृंगी भागात घडली.

याबाबत एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोथरूड भागात राहायला आहेत. चतु:शृंगी परिसरातील एका सोसायटीत त्यांची सदनिका आहे. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाट उचकटून चाेरट्यांनी तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. गुरुवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×