Breking News
बाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देशपिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृतीलाखो वारकऱ्यांपर्यंत पोहचली मदत व पुनर्वसन विभागाची वारीरुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचा वाद्यपूजन सराव शुभारंभ सोहळा उत्साहातपीएमपील बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटकउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकासकामांची पाहणीकीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरीप्रेम संबंधातून तरुण-अल्पवयीन मुलीची आत्महत्यापुणे इसिस मोड्यूल प्रकरणातील आणखी एका दहशतवाद्याला अटक

पुणे विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी

पुणे विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी

विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल

marathinews24.com

पुणे – आंतरराष्ट्रीय विमानतळावरील खाजगी कंपनीच्या ईमेल आयडीवर विमानतळ तसेच विमानांमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा ई-मेल प्रशासनाला प्राप्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचारी आदनान शेख (वय २४, रा. कोंढवा) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोयत्याच्या धाकाने केली लुटमार, अल्पवयीन मुलीवर अत्याचार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्टार एअर प्रायव्हेट कंपनीच्या ईमेल आयडीवर रविवारी (दि.२९) पहाटे दीड वाजता विमानतळ तसेच विमानतळावरील विमानांमध्ये बॉम्ब ठेवला आहे, अशा आशयाचा ईमेल प्राप्त झाला. सकाळी सात वाजता कंपनीच्या कर्मचार्‍यांनी तो ईमेल वाचला. त्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याबाबत विमानतळावरील नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानंतर विमानतळावरील सुरक्षा विभागाकडून संपूर्ण विमानतळाची तपासणी करण्यात आली.

दरम्यान, विमानातील प्रवासी तसेच विमानतळ परिसरातील नागरिक व प्रवाशांमध्ये खोटी माहिती आणि अफवा पसरवून भितीदायक वातावरण निर्माण केले तसेच त्यांच्या जि‍विताच्या सुरक्षिततेस धोका निर्माण केला म्हणून विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून पोलिसांकडून तांत्रिक तपास केला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top