Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

कॅपेक्स वाढ, वित्तीय शिस्तीवर भर देणारा अर्थसंकल्प; प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

कॅपेक्सला प्राधान्य, रोजगारनिर्मितीवर भर; दीर्घकालीन विकासाचा रोडमॅप – प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

marathinews24.com

पुणे – केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चाला (कॅपेक्स) प्राधान्य देत वित्तीय तूट कमी करण्यावर आणि कर्ज-जीडीपी गुणोत्तर अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला असून, हा अर्थसंकल्प आर्थिक विकास व वित्तीय शिस्त यांचा समतोल साधणारा आहे, अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी रविवारी दिली.

मुख्य सचिवांनी घेतला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा आढावा; नव्या नोंदणी भवनाची केली पाहणी – सविस्तर बातमी

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, या अर्थसंकल्पातून देशांतर्गत उत्पादन वाढवणे, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि विशेषतः युवकांसाठी रोजगारनिर्मितीला चालना देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहरे व ग्रामीण भाग यांचा समतोल विकास साधत सर्वसमावेशक प्रगतीवर भर देण्यात आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शेती, मच्छीमार व्यवसाय, दुग्धव्यवसाय व अनुषंगिक क्षेत्रांना चालना देतानाच महिलांच्या विकास व सुरक्षिततेसाठीही महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. “युवकांची क्षमता वाढवून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे,” असे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.

संरक्षण साहित्याची देशांतर्गत निर्मिती, अंतर्देशीय जलवाहतूक, रेअर अर्थ मटेरियल कॉरिडॉर, सेमीकंडक्टर्स, सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, बायोफार्मा उपक्रम आणि डेटा सेंटर हब्स ही या अर्थसंकल्पातील महत्त्वाची वैशिष्ट्ये असून, यामुळे भारताची दीर्घकालीन आर्थिक पायाभरणी अधिक मजबूत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्या वर्षी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना, जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक सातत्य आणि स्थिर आर्थिक नेतृत्वाचे हे प्रतीक असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×