काळेपडळ पोलीस, महापालिकेची संयुक्त कारवाई
marathinews24.com
पुणे – हडपसर परिसरात दहशत माजविणार्या कुख्यात गुंड रिझवान ऊर्फ टिपु सत्तार पठाण याच्याविरूद्ध पुणे पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. त्याने सय्यदनगर परिसरात अनधिकृत कार्यालय उभारले होते. संबंधित बांधकाम पाडण्यासाठी काळेपडळ पोलिसांनी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला पत्रव्यवहार केला होता. त्याच अनुषंगाने महापालिकेने शुक्रवारी (दि.२६) ख्वाजा मंजील इमारतीवर असलेले अनधिकृत कार्यालय उध्वस्त केले.
पुण्यातील सराईत चोर पक्याला बेड्या, ४ मोबाइल जप्त – सविस्तर बातमी
कुख्यात गुंड रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण ( रा. सय्यदनगर, हडपसर) सराईत असून,त्याच्याविरूद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यातंर्गत विविध गुन्हे आहेत. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पठाणसह टोळीविरूद्ध मोक्का कारवाई केली होती. संबंधित गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हडपसरमधील सय्यदनगर भागात पठाणने बेकायदेशीपणे ऑफीस, टपरी व इतर अनाधिकृत अतिक्रमण केले होते. काळेपडळ पोलीसांनी माहिती प्राप्त करुन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला पत्र पाठविले होते. त्यापार्श्वभूमीवर २६ सप्टेंबरला काळेपडळ पोलीस, अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करीत अतिक्रमण उध्वस्त केले आहे.
पठाणने उभारलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी महापालिका प्रशासनासह काळेपडळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. कायदा सुयव्यवस्थेच्या अनुषंगारने अनधिकृत बांधकामावर बुलढोझर चालविण्यात आला. दरम्यान, अतिक्रमण पाडकाम सुरू असताना परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमली होती. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्यासह कर्मचार्यांच्या उपस्थित करण्यात आली.
कुख्यात गुंड टिपू पठाण याने सय्यदनगरात अनधिकृत बांधकाम केले होते. यासंदर्भात महापालिका प्रशासनाला पत्र पाठवले होते. त्यानुसार अतिक्रमण विरोधी पथकाने संबंधित अनधिकृत बांधकाम पाडले आहे. ेकाळेपडळ पोलीस आणि महापालिका प्रशासनासोबत संयुक्त मोहिम राबविण्यात आली. – डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त, झोन पाच





















