युनिट दोनची कामगिरी
marathinews24.com
पुणे – स्वारगेट हद्दीत घडलेल्या घरफोडीचा गुन्हा गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ४० हजारांची रोकड, दुचाकी असा १ लाख २० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.निखिल विजय पवार (१९, रा. बिबवेवाडी) व अनुराग विजय पवार (२१, रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.
कासेवाडीत अल्पवयीनांकडून १२ वाहनांची तोडफोड – सविस्तर बातमी
गुलटेकडीतील सुयोग टॉवरमधील ऑफिसमध्ये सहाव्या मजल्यावर घरफोडी झाल्याची घटना १९ सप्टेंबरमध्ये घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी बिबवेवाडी, कोंढवा, मार्केटयार्ड व स्वारगेट परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. स्थानिक नागरिकांकडून माहिती घेत आरोपींचा शोध लावला.
सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गंगाधाम चौकातून कोंढव्याच्या दिशेने मोटार सायकलवर जाणारे आरोपी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी निखिल पवार व अनुराग विजय पवार अशी नावे सांगितली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरीतील ४० हजारांची रोकड, दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच दि.३ ऑक्टोबरला पोलिसांनी या प्रकरणातील पाहिजे आरोपी गौरव संजय पवार (वय २०, रा. गुलटेकडी, स्वारगेट) यास अटक केली. त्याच्याकडून ८ हजार ५०० रुपये आणि ५० ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्कीट जप्त केली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान,एपीआय अमोल रसाळ, एपीआय आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार जाधव, मोकाशी, नेवसे, पवार, टकले, चव्हाण, सरडे, आबनावे, जाधव, कुंभार, थोरात, भिलारे, शिंदे, तांबोळी, वगारे, ताम्हाणे यांनी केली.



















