१ लाखांच्या रोकडसह पावणे दोन लाख रूपये लंपास – कोरेगाव पार्कमधील घटना
marathinews24.com
पुणे – पैसे पडल्याचे सांगून चोरट्याने कार चालकाचे लक्ष विचलित करून १ लाख रुपयांची रोकड आणि इतर ऐवज असलेली पावणे दोन लाखांची बॅग चोरून नेली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक नवनाथ काकडे (४२, रा. काकडे मळा, पुनावाला स्टँड फॉर्मजवळ, थेऊर) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २३ एप्रिलला सायंकाळी सातच्या सुमारास कोरेगाव पार्कमधील ढोले पाटील रोडवरील रेस्टॉरंटसमोर घडली.
पेट्रोल पंपावर दरोडाची तयारीत असलेल्या टोळीला अटकाव – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार काकडे हे बांधकाम व्यावसायिक असून, कामानिमित्त २३ एप्रिलला धर्मादाय आयुक्त कार्यालयात आले होते. त्यांच्या गाडीचा चालक संजय जाधव याने गाडी रेस्टॉरंटसमोर उभी करून बसला होता. त्यावेळी एकजण फोनवर बोलत त्यांच्याजवळ आला. तुमचे पैसे खाली पडले असल्याची बतावणी त्याने केली. त्यामुळे चालक संजय जाधव यांनी बाहेर येऊन खाली पाहिले असता त्यांना पैसे दिसून आले. पैसे घेण्यासाठी जाधव हे खाली वाकले असता, चोरट्याने गाडीतील मागच्या सीटवर ठेवलेली ब्रीफकेस चोरली. दोघांव्यतिरिक्त अन्य दोन चोरटे पाळत ठेवून त्यांना मदत करत होते.
एक लाखांच्या रोकडसह अन्य ऐवज चोरीला
नागरिक अजय खंडेलवाल यांनी घटना पाहून जोरात आवाज दिला. चालक संजय जाधव यांना गाडीतून बॅग चोरी करुन नेत असल्याचे सांगितले. जाधव यांनी त्यांचा पाठलाग करेपर्यंत चोरटे पळून गेले. ब्रिफकेसमध्ये १ लाख रुपये रोख, कपडे, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड, ओळखपत्र असा १ लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज होता. पुढील तपास सहायक पोलिस फौजदार सावंत करत आहेत.