३० लाखांचा ऐवज जप्त, चतुःशृगी पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – परराज्यातून पुण्यात येउन बीएसएनएल कंपनीची केबल चोरणार्या टोळीचा चतुःशृंगी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कंपनीचे कामगार असल्याचे भासवत टोळीने काळजी घेत चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. टोळीकडून टेम्पो, रिक्षा, एक क्रेन, चोरीस गेला मुददेमाल, महापालिका मजुर वापर असलेले हेल्मेट, रिफलेक्टींग जॅकेट, लाईट बॅटन, बॅरीकेटस, हातोडा, करवत, पहार, लोखंडी सत्तुर असा ३० लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
तब्बल ५० पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सराईताला अटक – सविस्तर बातमी
नसरुल बिलाल मोहम्मद (वय २३ रा. हरिजन कॅम्प मंडावली फाजलपुर, लक्ष्मी नगर, नवी दिल्ली) संजीव कुमार श्रीसेवाराम वर्मा (वय ३७ ,रा. साऊथ गणेशनगर नवी दिल्ली) फईम अहमद शरीफ अहमद शेख (वय ४२ रा. कलवड वस्ती, लोहगाव पुणे) वारीस फकीर मोहम्मद (वय ३५, रा. हरिजन कॅम्प मंडावली, फाजलपुर लक्ष्मी नगर, नवी दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही चोरी १७ ते १८ सप्टेंबर कालावधीत झाली होती.
औंधमधील परिहार चौकात बी.एस.एन.एल. कंपनीची अंडर ग्राउंड फिनोलॅक्स कंपनीची २०० मीटर लांबीची कॉपर केबल टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी चोरट्यांनी संधी साधून केबल चोरी करून नेली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपी हे संगमवाडी पुणे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने त्यांना अटक केली. ही कामगिरी एसीपी विठठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक आश्विनी ननावरे, सहायक पोलीस निरीक्षक पोटे, श्रीधर शिर्वेâ, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, बाबासाहेब दांगडे, वाघेश कांबळे, तुषार गिरंगे यांनी केली.





















