ग्रंथभेट योजनेसाठी प्रकाशित ग्रंथ सादर करण्याचे आवाहन

ग्रंथालयांना भेट देण्यासाठी ग्रंथ निवडीची प्रक्रिया सुरू

marathinews24.com

पुणे – राज्य शासन आणि राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी ‘ग्रंथभेट’ योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत ग्रंथालय संचालनालय स्तरावरुन प्रसिद्ध होणाऱ्या शासनमान्य ग्रंथ निवड यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी सन २०२५ मध्ये प्रकाशित ग्रंथ २८ फेब्रुवारी पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई- ४००००१ यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दादा, ताकदीचा नेता नियतीने हिराहून घेतला ! – सविस्तर बातमी

या योजनेंतर्गत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ खरेदी करुन राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेट म्हणून देण्यात येतात. या योजनेत ग्रंथांची निवड करण्यासाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक विनामूल्य प्रत सादर करणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी यापूर्वी संचालनालयास ग्रंथ पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही. मुद्रकाने व प्रकाशकाने ग्रंथाची एक प्रत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय मुंबई, शासकीय विभागीय ग्रंथालय पुणे व नागपूर येथे पाठविणे आवश्यक आहे. संबंधित ग्रंथालयास सदर ग्रंथ पोहोचल्याची पोच पावती प्राप्त करून ग्रंथालय संचालनालयास ग्रंथांसोबत पोच पावती टपालामार्फत वा समक्ष पाठविण्यात यावी. विहित तारखेनंतर प्राप्त झालेल्या ग्रंथांचा निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही, असेही ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×