चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.c0m
पुणे – शहरातील मध्यवर्ती तुळशीबागेत चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी २९ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना गुरुवारी घडली. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गॅस पुरवठा खंडीत करण्याच्या बतावणीने फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळची अहिल्यानगरमधील केडगावमधील रहिवासी आहे. भाऊबीजेच्या दिवशी (२३ ऑक्टाेबर) महिला खरेदीसाठी तुळशीबागेत आली होती. तुळशीबागेत दुपारी साडेबाराच्या सुमारास गर्दी होती. खरेदी करताना महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी २९ हजार ३०० रुपयांची रोकड लांबविली. रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस कर्मचारी ननावरे तपास करत आहेत. तुळशीबागेत गेल्या काही महिन्यांपासून खरेदीसाठी येणाऱ्या महिलांच्या पिशवीतून दागिने, रोकड चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली.





















