गणपती मूर्ती विक्री स्टॉलवरील २ लाखांची रोकड चोरीला

सराईताकडून पिस्तूलसह दोन काडतुसे जप्त

तिघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गणपती मुर्ती विक्रीच्या स्टॉलवरून चोरट्यांनी पर्समधील २ लाखांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना २७ ऑगस्टला संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास वारजेतील हॉटेल चिलापी शेजारील स्टॉलमध्ये घडली आहे. याप्रकरणी तिघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूडमध्ये राहणार्‍या नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहायला असून, वारजेतील चिलापी हॉटेलजवळ त्यांनी गणपती मुर्ती विक्रीचा स्टॉल लावला होता. २७ ऑगस्टला संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास गणपती मुर्ती घेण्यासाठी आलेल्या तिघांनी रॅकमध्ये असलेल्या पर्समधील २ लाखांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर संबंधिताने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करीत आहेत.

गाडीचा दरवाजा लॉक न करणे भोवले, ६० हजारांचा मोबाइल चोरीला

दुध आणण्यासाठी गेल्यानंतर मोटारीचा दरवाजा बंद न केल्यामुळे चोरट्यांनी गाडीतील ६० हजार रूपये किंमतीचा मोबाइल चोरून नेला आहे. ही घटना ९ ऑगस्टला दुपारी पावणेदोनच्या सुमारास आंबेगावमधील शनिनगर चौकातील बालाजी दुध डेअरीजवळ घडली आहे. याप्रकरणी आंबेगाव खुर्दमध्ये राहणार्‍या तरूणाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण आंबेगाव खुर्दमध्ये राहायला असून, ९ ऑगस्टला दुपारी आंबेगावमधील शनिनगर चौकातील बालाजी दुध डेअरीत दुध आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याने डेअरजवळील रस्त्यावर मोटार उभी करून गाडीतच मोबाइल ठेवला होता. गाडीच्या काचा उघड्या ठेउन दरवाजाही लॉक न केल्याची संधी साधून चोरट्यांनी ६० हजारांचा मोबाइल चोरून नेला. दुध घेउून आल्यानंतर तरूणाला गाडीत मोबाइल दिसून आला नाही. याप्रकरणी पोलीस अमलदार साठे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×