Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

पुणे, मुंबईतील बेकायदा काॅलसेंटरवर सीबीआयचे छापे

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) पुणे, मुबईतील काॅलसेंटरवर छापा टाकून तिघांना अटक केली. याप्रकरणात एका बँक अधिकाऱ्यााविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघांना सीबीआयने मुंबईतील विशेष न्यायालयात हजर केले. त्यांना विशेष न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेस दिले.

बेकायदेशिररित्या गांजा बाळगणार्‍याला बेड्या – सविस्तर बातमी – सविस्तर बातमी

पुणे, मुंबईतील काॅलसेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती सीबीआयच्या मुंबई कार्यालयाला मिळाली होती. याप्रकरणाचा तपास सीबी्ायकडून करण्यात येत होता. फसवणुकीतून मिळालेली रक्कम बनावट बँक खात्यात वळविण्यात आली होती. संबंधित बँक अधिकाऱ्यांनी आरोपींनी संगनमत करुन बनावट कागदपत्रांद्वारे बँक खाते उघडल्याची माहिती मिळाली होती. काही रक्कम हवालामार्फत हस्तांतरित केली जायची. दरमहा साधारणपणे तीन ते चार कोटी रुपयांची फसवणूक केली जात होती. याबाबतची माहिती सीबीआयच्या पथकाला मिळाली होती. काॅलसेंटर चालकासह कर्मचाऱ्यांच्या सदनिकेत छापे टाकून रोकड जप्त करण्यात आली. काॅल सेंटरमधील एका कर्मचाऱ्याच्या सदनिकेतून अमली पदार्थही जप्त करण्यात आली. या कारवाईत सीबीआयच्या पथकाने २७ मोबाइल, १७ लॅपटाॅप, आभासी चलन, रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सीबीआयच्या पथकाने सात ठिकाणी कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींनी फसणूक करण्यासाठी समाजमाध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. आभासी चलनात गुंतणूक, तसेच गिफ्टकार्डच्या आमिषाने आरोपींनी फसवणूक केली. बनावट काॅलसेंटरच्या माध्यमातून आरोपी दरमहा तीन ते चार कोटी रुपये मिळवित होते. फसवणुकीतून मिळालेली रक्कम आरोपी बनावट नावाने उघडलेल्या बँक खात्यात हस्तांतरित करायचे. हवालाच्या माध्यमातून काही रक्कम आरोपींना मिळाली होती.

आरोपींकडून १० लाख २० हजार, सहा लाख ९४ हजार रुपये मूल्य असलेले आभासी चलन, १५० ग्रॅम अमली पदार्थ, लॅपटाॅप, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणाचा सीबीआय मुंबई कार्यालयाकडून तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×