Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

बेकायदेशिररित्या गांजा बाळगणार्‍याला बेड्या

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

जनता वसाहत परिसरात कारवाई

marathinews24.com

पुणे – जनता वसहात परिसरात बेकायदेशिरित्या विक्रीसाठी सव्वा नऊ किलो गांजा बाळगल्या प्रकरणी एकावर पर्वती पोलिसांनी कारवाई करून अटक केली. विशाल शिवाजी खरात (३६, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस अमंलदार नानासो शंकर खाडे यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. २४ जुले रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जनता वसाहत कॅनोलरोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपी बेकायदेशिररित्या ३५ हजार रूपये किंमतीचा प्लॅस्टीकच्या कॅरीबॅगमध्ये ९१५ ग्रॅम गांजा होता तो पकडले

शिवीगाळ करत मारहाण

महिलेला अश्लिल भाषेत शिवीगाळ करून कोयता व तलवरीचा धाक दाखवून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घउला. याप्रकरणी अनिकेत राजेश शेलार (रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) मंथन सागर गडवे, आणि अमीत अशांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी जुन्या भांडण्याच्या कारणावरून अश्लिल शिवीगाळ केल्याचे व दहशत पसरविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत महिलेच्या भावजयने याबात तक्रार दिली आहे. यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या पतीवरही तलवार उगारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी गुन्हा

चौदा वर्षाची अल्पवयीन तिच्या शाळेच्या गेटवर थांबली असताना दुचाकीवर आलेल्या एकाने तिची छेड काढल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन किसन राठोड (२०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या मोठ्या बहीनेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२५ ते जुलै २०२५ दरम्यान घडला.

तरूणीचा पाठलाग करणार्‍यावर गुन्हा

तरूणीला वारंवार व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज करून व तचा पाठलाग कयन अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी एका अज्ञात मोबाईल धारकारवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २४ वर्षीय तरूणीने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २१ जुले रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येरवडा परिसरात घडला.

अश्लिल हातवारे करणार्‍यावर गुन्हा दाखल

दुचाकीवरून महिलेचा छुपार पाठलाग कयन तिला अश्लिल हातवारे करून विनयभंग करणार्‍या एकावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित जाधव (२५, दुर्गा माता मंदिराजवळ, जयजवाननगर, येरवडा, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३५ वर्षीय महिलेनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण, चौघांवर गुन्हा दाखल

चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणात चौघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रबिना शेख, रममान शेख, असिफ शेख, गब्बर शेख (५०, रा. गाडीतळ, येरवडा) याबाबत पिडीत मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दखल करण्यात आला आहे. हा प्रकार २४ जुलै रोजी दुपारी घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीत मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचे म्हटले आहे.

तरूणीला अश्लिल मॅसेज करून विनयभंग

तरूणीला वारंवार मॅसेज करून तिला अश्लिल मॅसेज आणि अश्लिल व्हिडीओ कॉल करून विनयभंग करणार्‍या अज्ञात मोबाईल धारकावर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका तरूणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २३ जुलै रोजी दुपरी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घउला. आरोपीने तरूणीला एसएमएस करून, टेलिग्रामवर अश्लिल मॅसेज पाठवले. त्यानंतर तिला व्हिडीओ कॉल करून त्याचे प्रायव्हेट पार्ट तरूणीला दाखवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×