डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून भाविकांना शुभेच्छा
marathinews24.com
मुंबई – कार्तिकी भागवत एकादशीचा पवित्र दिवस असून राज्यभरातून हजारो भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत.लाखो वारकरी श्री विठ्ठल-रूक्मिणींच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होत पूजा, भजन, कीर्तन आणि उपवास या मार्गाने श्रद्धेची ओंजळ अर्पण करत आहेत. या दिवशी तुळशी विवाह सोहळ्याचाही शुभारंभ होत असून वातावरण भक्तिरसाने ओथंबून गेले आहे. त्यापार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील सर्व वारकरी, भक्त आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉक्सर चंद्रिका पुजारी पुण्याची नवी सुवर्णकन्या – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ – सविस्तर बातमी
भागवत एकादशी आणि तुळशी विवाह हे भक्ती, प्रेम आणि अध्यात्म यांचे प्रतीक आहेत. या निमित्ताने प्रत्येकाच्या जीवनात प्रेम, सौख्य आणि समृद्धी नांदो. श्री विठ्ठल-रूक्मिणी आणि तुळशी मातेकडे हीच प्रार्थना.”
डॉ. गोऱ्हे यांनी पुढे सांगितले की, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक ओळखीचा केंद्रबिंदू आहे. महिलांचा सक्रीय सहभाग या परंपरेला अधिक बळकटी देतो. या सणाच्या माध्यमातून समाजात समानता, सेवाभाव आणि सद्भाव यांचे मूल्य वाढावे हीच खरी विठ्ठलभक्ती आहे.”
आजच्या पवित्र दिवसानिमित्त राज्यभरातील मंदिरे, वारकरी पथके आणि भक्तगृहांमध्ये तुळशी विवाहाचे सोहळे, कीर्तन व भजनाचे कार्यक्रम उत्साहात पार पडत आहेत. श्री विठ्ठल-रूक्मिणींना कोटी वंदन! भागवत एकादशी आणि तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा! असे त्यांनी म्हटले आहे.




















