Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

पुण्यात नववर्षांच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – शहरात थर्टी फस्ट सेलिब्रेशनसह नववर्षाच्या स्वागतानिमित्त वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार ३१ डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजेपासून गर्दी संपेपर्यंत वाहतूकीत बदल केला आहे. तसेच शहरातंर्गत वाहतूकीला १ जानेवारी रात्री बारावाजेपर्यंत सर्व प्रकाराच्या जड वाहनांना नो एन्ट्री केली आहे. त्यादृष्टीने वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त हिंम्मत जाधव यांनी केले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी नदीत उडी मारून दरोडेखोरांना पकडले – सविस्तर बातमी

सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबरला नागरीक मोठ्या संख्येने रस्त्यावर गर्दी करतात. त्यापार्श्वभूमीवर नागरीकांना नववर्षाचा आनंद घेता यावा, कोणत्याही प्रकारची वाहतुक कोंडी होऊ नये, यादृष्टीने वाहतुक शाखेकडून वाहतुकीमध्ये बदल केला आहे. मध्यवर्ती कॅम्प व फरासखाना भागातील रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये बदल केला असून, उपनगरामध्ये १ जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांना (ट्रक, डंपर, मिक्सर, बल्कर, जेसीबी, रोडरोलर) बंदी घालण्यात आली आहे.

कॅम्प परिसरातील वाहतुकीमध्ये बदल

– वाय जंक्शनवरुन एम.जी. रोडकडे येणारी वाहतुक १५ ऑगस्ट चौक येथे बंद केली असून, वाहतुक कुरेशी मशीद व सुजाता मस्तानी चौकातुन पुढे सुजाता मस्तानी चौकाकडे वळवली आहे.

– ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतुक बंद केली जाणार आहे.

– व्होल्गा चौकाकडून मंहम्मद रफी चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करीत संबंधित वाहतुक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकातुन पुढे जाईल.

– इंदिरा गांधी चौकातुन महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद केली जाणार असून, ही वाहतूक लष्कर पोलिस ठाणे चौकाकडे वळविण्यात येणार आहे.

-सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करुन ती ताबुत स्ट्रीट मार्गे पुढे सोडण्यात येणार आहे.

फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्ता वाहतूक बदल

– कोथरूडसह कर्वेनगरातून येणारी वाहतूक खंडोजीबाबा चौकात आवश्यकतेप्रमाणे बंद केली जाणार आहे. संबंधित वाहतूक लॉ कॉलेज रस्ता, प्रभात रोडसह अलका टॉकीज चौकातून वळवली जाणार आहे.

– जंगली महाराज रस्ता परिसरातून खंडोजीबाबा चौक मार्गे जाणारी वाहतूक गुडलक चौकासह इतर लेनमधून फर्ग्युसन कॉलेज रोडने मार्गस्थ केली जाणार आहे. तसेच वाहतूक आवश्यकतेप्रमाणे झाशी राणी चौकात अडवून महानगरपालिका, ओंकारेश्वर मंदीर, शिवाजी रोडने मार्गस्थ केली जाणार आहे.

नो व्हेईकल झोन ३१ डिसेंबर ते १ जानेवारी (दुपारी पाचपर्यंत)

गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेन गेटपर्यंत
एमजी रोड- १५ ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर

अवजड वाहनांना बंदी असलेले चौक

थेउर फाटा, लोणीकाळभोर पासून पुढे, हॅरिष ब्रिज, खडकी, बोपखेल, विश्रांतवाडी, राधा चौक, बाणेर, नवले ब्रीज, वारजे, कात्रज चौक, खडीमशीन चौक, मंतरवाडी फाटा फुरसुंगी, मरकळ ब्रीजपासून पुढे प्रवेश बंद ठेवला जाणार आहे.

शहरातील विविध भागात नववर्षांच्या अनुषंगाने वाहतूकीत बदल केला आहे. चालकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करून अमलदारांसह अधिकार्‍यांन सहकार्य करावे. विशेषतः मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना ३१ डिसेंबर संध्याकाळी पाचपासून बंदी केली आहे. दरम्यान, मद्यपान करून वाहने चालवू नका, अन्यथा ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह मोहिमेत कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. – हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×