आता काय सरकार शेतकरी मरायची वाट पाहताय काय?
marathinews24.com
बीड : (अनंत जाधव) – जिल्ह्यासह संपूर्ण
मराठवाड्यावर निसर्ग कोपला असून, मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यावर अतिवृष्टीचे संकट कायम असून माजलगाव, मांजरा, बिंदुसरा ही धरणे भरली आहेत. पावसामुळे नद्यांना महापुर आल्यामुळे गावा गावात पाणी शिरले आहे. दि.२७ झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह, नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. माय बाप सरकार शेतकऱ्यांची पुरात पीके, जनावरे गेली आता काय शेतकरी मरायची वाट पाहताय काय? पिकांची नुकसान भरपाई, मदतीचे आश्वासने झाली मग घोडे कुठे आडले असा संताप सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यात खासदार मेधा कुलकर्णींनी बंद पाडला गरबा – सविस्तर बातमी
जिल्ह्यातील पिंपळादेवी गावांमध्ये पाणी शिरून स्मशानभूमी पाण्यात गेली होती. त्यामुळे एका वृद्ध महिलेचा अंत्यसंस्कार कुठे करायचा? असा उपस्थित झाला होता. तर केज तालुक्यातील मांजरा नदीकाठी असलेल्या दैठणा (ता. केज) गावातील एका शेतकऱ्याचा ऊस, सोयाबीन पीक हाता तोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकऱ्यांचा धीर खचल्याने ओढ्याच्या पुरात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यानी समयसूचकता दाखवीत त्याला अडवून जीव वाचवला आहे.
केज तालुक्यात आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतातील पिके सडून गेली आहेत. त्यामुळे पिकांवर केलेला खर्च आता कसा निघणार आणि खिशात पैसा नसल्याने संसार कसा चालणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले आहेत.
ऊस, सोयाबीन पिकात पाणी खंडू हरिचंद्र मुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. पेरणी आणि खतासह मशागतीसाठी झालेले कर्ज आणि मेहनत वाया गेल्याने आता अंगावर झालेले कर्ज कसे फेडणार? या विचाराने खचून खंडू मुळे शेतकऱ्याने २७ सप्टेंबर रोजी दुपारी नाव्होलीकडून दैठण्याकडे वाहत आलेल्या पुराच्या पाण्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सरकारला का जमत नाही असा सवाल देखील शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये उपस्थित आहे. शेतकऱ्यांने मरावे की जगावं हे केज तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कळेना झालंय तरी मायबाप सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपावलीच्या पुर्वसंध्येला शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पीकांचे नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांचे तोंड गोड करण्याची मागणी केज तालुक्यातील, जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे.
नाम फाउंडेशन शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले
पत्रकार विलास बडे आणि विविध माध्यमांनी केलेल्या प्रसारित केलेल्या बातम्या आणि नुकसानीचे वास्तव दाखवून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान दाखवले. त्यानंतर नाम फाऊंडेशनचे सर्वेसर्वा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी न्यूज १८ चे वृत्त निवेदक विलास बडे यांच्याशी संवाद साधून, मदतीसाठी हात पुढे केला. पुरग्रस्त गावांना नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे हे नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत करणार आहेत. सामाजिक क्षेत्रातील लोकांना बळीराजाच्या नुकसानीचे जान आहे मात्र सरकार मात्र फक्त पोकळ आश्वासने देण्यात दंग आहे तरी सरकार कधी मदतीसाठी सरसावणार असा सवाल उपस्थित होत आहे.
केज तालुक्यातील बेलगाव या गावाचा शुक्रवार पासून संपर्क तुटला आहे. त्यामूळे पात्रावून जाणारा रस्ता बंद झाला आहे. पाण्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. गेली तब्बल आठ दिवसांपासुन सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे .गावात आरोग्य उपाययोजना नसल्यामुळे एखाद्या गावातील नागरिक आजारी पडला तरीही या पुलावरून जाता येत नाही. पुलावरील पाणी ओसरत नसल्याने गावातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोयाबीन पिकाचे भरपूर नुकसान झाले आहे. शेतकरी अंतिम संकटात आहे त्यामुळे प्रशासनाने या नुकसानीचे तात्काळ द्यावी, अशी मागणी बेलगाव ता. केज. गावचे शेतकरी अक्षय अशोक दातार यांनी केली.



















