Breking News
हिंदुस्थानची जीवनशैली पर्यावरण पूरक- माजी केंद्रीय पर्यावरण, वनमंत्री प्रकाश जावडेकरकुख्यात गुंड शाहरुख ऊर्फ हट्टी रहीम शेख याचा एन्काऊंटर; सराईत टिपू पठाण टोळीत होता कार्यरतसंतांच्या पालखी सोहळ्यांना आधुनिकेचा साज…नीट २०२५ निकाल जाहीर; राजस्थानचा महेश देशात प्रथम, महाराष्ट्राचा कृषांग तिसराआषाढी वारीतील दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान; शासन निर्णय जारीशालेय साहित्य खरेदी आणि चतुर्थीनिमित्त गर्दीलूटमार करणारा सराइत गजाआड..विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून शासनाचे सर्वतोपरी सहकार्य-दादाजी भुसेशिक्षकांचा गुणवत्तेचा दर्जा वाढविण्याकरीता प्रयत्न करणे गरजेचे- डॉ. नीलम गोऱ्हेशिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार

बँकेत चेक वठविला, किराणा दुकानदारासह कुटूंबियाला बेदम मारहाण..

हडपसरमधील मांजरी बुद्रुक परिसरातील घटना

Marathinews24.com

पुणे – उधारीवरील किराणा मालाचे पैसे देत नसल्यामुळे दुकानादाराने संबंधिताने दिलेल्या चेक वटवून ११ हजार रूपये काढून घेतले. त्याच रागातून कुटुंबाने किराणा दुकानदाराला बेदम मारहाण करीत त्यांच्या दुकानातील वस्तू फेकून दिल्या. ही घटना १५ एप्रिलला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ओम बालाजी ट्रेडर्स दुकानात घडली. याप्रकरणी वैभव ज्ञानदेव चव्हाण (वय २९, रा. गुरुदत्त पार्क, मोरे वस्ती रोड, मांजरी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विठ्ठल बाळू कुचेकर, अशोक विठ्ठल कुचेकर, प्रणव रावळ (सर्व रा. मोरे वस्ती, मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

वर्षभरापासून पसार असलेल्या सराईत गुन्हेगाराला बेड्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वैभव चव्हाण यांचे ओम बालाजी ट्रेडर्स किराणा दुकान असून, त्यांच्या दुकानाशेजारी आरोपी विठ्ठल बाळू कुचेकर राहतात. वैभवने ८ सप्टेंबर २०२४ मध्ये विठ्ठल कुचेकर याला ६० हजार रुपयांना दुचाकी विकली होती. त्याचे ५४ हजार रुपये कुचेकरने वैभवला दिले होते. उर्वरित ६ हजार रुपये तो देत नव्हता. तसेच विठ्ठल हा वैभवच्या दुकानातून नेहमी किराणा सामान उधारीवर नेत होता. त्याचे ५ हजार रुपये उधारी झाली होती. त्यांनी पैसे मागितल्यावर विठ्ठल वारंवार आज देतो, उद्या देतो, असे बोलत टाळाटाळ करीत होता. दरम्यान, दुचाकीच्या व्यवहारावेळी विठ्ठलने त्याच्या बँकेचा चेक वैभवला दिला होता.

बेदम मारहाण करीत दुकानातील साहित्याचे केले नुकसान

वैभवने बँकेत चेक वटवून ११ हजार रूपये काढून घेतले. त्याचा राग आल्यामुळे आरोपी कुचेकर यानी १५ एप्रिलला वैभव व त्यांच्या कुटूंबियांना दुकानात गाठले. त्यांच्याशी हुज्जत घालून तुम्ही चेक का वटवले असे म्हणून बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी वैभव यांच्या दुकानातील वस्तू फेकून देत नासधूस केली. काही वेळाने त्यांचा मुलगा अशोक कुचेकर व त्याचे मित्र प्रणव रावळ व इतर तेथे आले. त्यांनी पट्टयाने वैभवला मारहाण केली. त्यांच्या वडिलांना काठी व दगडाने डोक्यावर मारहाण करुन जखमी केले. पोलिस हवालदार बनसुडे पुढील तपास करत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top