Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानंतर बारामतीत स्वच्छता मोहीम

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परंपरेला साजेचे काम

marathinews24.com

बारामती – जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष, आरोग्य सभापती आणि नगरसेवक सदस्य व मुख्याधिकारी हे स्वतः शहरामध्ये पालखीचे आगमन आणि प्रस्थान
झाल्यानंतर बारामतीच्या परंपरेला साजेचे काम करण्यात आले.

‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची मोडतोड – सविस्तर बातमी

शहर स्वच्छतेच्या कार्यामध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासन, सामजिक सेवाभावी संस्था, नागरिकांनी मिळून सहभाग घेऊन गांधी चौक ते गुणवडी चौक यादरम्यान रस्त्याची स्वतः नगराध्यक्ष, सभापती व मुख्याधिकारी प्रत्यक्ष सहभागी होवून संपूर्ण स्वच्छता करुन घेतली.

नगराध्यक्ष व लोकप्रतिनिधी व वरीष्ठ अधिकारी यांच्या स्वच्छतेच्या कामातील सक्रिय योगदानामुळे सर्व सफाई कर्मचारी व इतर अधिकारी यांना प्रोत्साहन मिळून त्यांनी देखील आपल योगदान देवून स्वच्छता मध्ये मोलाची भर घातलेली आहे.

शहरामध्ये शारदा प्रांगण येथे पालखी मुक्कामी आल्यानंतर केवळ एका तासाच्या आतमध्ये नागवडे वस्ती ते देशमुख चौक ते शारदा प्रांगण तसेच संपूर्ण शहर, शारदा प्रांगण, मुख्य रस्ते मैदाने यांची स्वच्छ करून केली. बारामती स्वच्छ सुंदर ठेवून सर्वांनी मोलाची भूमिका निभावलेली. आज सकाळीदेखील शारदा प्रांगण येथून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर एका तासाच्या आत शहरातील मुख्य रस्ते स्वच्छ करण्यात आलेले आहेत.

नगराध्यक्ष सचिन सातव, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ, मुख्याधिकारी पंकज भुसे, दोन मुख्य आरोग्य निरीक्षक, सुमारे १८ मुकादम व ४५० सफाई मित्र यांनी अहोरात्र मेहनत घेऊन बारामती शहराच्या परंपरेला साजेसे काम करुन शहरातील संपूर्ण रस्त्यांची स्वच्छता सुव्यवस्था राखलेली आहे.

जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहोळ्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याच्या परंपरेस साधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदने अभूतपूर्व स्वच्छता राबवून संपूर्ण शहर स्वच्छ करण्यात आलेले आहे. – सचिन सातव, नगराध्यक्ष

बारामती शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र काम करणार्‍या सफाई कर्मचारी यांच्या मोलाच्या योगदानातून पालखी सोहळ्यात संपूर्ण शहराची स्वच्छता विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आलेली आहे. – नवनाथ बल्लाळ, आरोग्य सभापती

बारामती नगरपरिषदेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून नियोजनबद्ध कामकाज करून पालखी सोहळादरम्यान संपूर्ण शहराची स्वच्छता केली. – पंकज भुसे, मुख्याधिकारी

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×