Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

दहशतवादी संघटनेच्या संपर्कातील संगणक अभियंता गजाआड

कोथरूडमध्ये १७ वर्षीय मुलाच्या खुनाचा दोन तासांत छडा

एटीएसची पुणे स्टेशन परिसरात कारवाई

marathinews24.com

पुणे – दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या संगणक अभियंता तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. एटीएसने ९ ऑक्टोबर रोजी कोंढवा, वानवडी, खडकी भागात छापे टाकले होते. याप्रकरणाचा तपासात मिळालेल्या माहितीनुसार कोंढव्यात वास्तव्यास संगणक अभियंता तरुणाला अटक करण्यात आली. एटीएसच्या कारवाईनंतर तो चेन्नईला गेला होता. चेन्नईहून पुणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

पाळीव श्वानाकडून चावा; श्वान मालकांविरुद्ध गुन्हे – सविस्तर बातमी

झुबेर हंगरगेकर (वय ३२, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झुबेर मूळचा सोलापूरचा असून, तो उच्चशिक्षित आहे. तो माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली. एटीएसने ९ ऑक्टोबर रोजी कोंढवा, वानवडी, खडकीसह शहरातील वेगवेगळ्या भागात कारवाई केली होती. याप्रकरणात १८ जणांना संशयावरुन तााब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून १९ लॅपटॉप, मोबाइल, तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते.

लॅपटाॅपमधील माहितीचे विश्लेषण करण्यात आले. जुबेर हा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. झुबेर हा चेन्नईला गेला होता. चेन्नईहून परतताच त्याला पुुणे रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. २०२३ मध्ये पुण्यात पकडलेल्या ‘आयसीस’च्या दहशतवाद्यांनी मुंबई, पुणे, तसेच गुजरातमधील प्रमुख शहरात बाॅम्बस्फाेट घडवून आणण्याचा कट रचला होता. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील जंगलात त्यांनी बाॅम्बस्फोटाची चाचणी केली होती. पुण्यातील कोंढवा भागात त्यांनी बाॅम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघडकीस आले होते. दहशतवाद्यांनी सातारा जिल्ह्यातील वस्त्रदालनात दरोडा टाकून त्यांनी बॉम्बस्फोटाचे साहित्य खरेदी केले होते. कोंढव्यात त्यांनी बाॅम्ब कसा तयार करायचा याबाबतचे प्रशिक्षण घेतले होते.

कोल्हापूर, सातारा परिसरातील जंगलात त्यांनी नियंत्रित पद्धतीने बाॅम्बस्फोट केले होते. त्यांनी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानंतर एनआयएच्या पथकाने कोंढव्यातील मीठानगर परिसरातील इमारत जप्त केली.दहशतवादी महाराष्ट्रात ‘आयसीस’च्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करून तरुणांची माथी भडकावत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यांनी पुणे, मुंबईसह गुजरातमधील मोठ्या शहरात बाॅम्बस्फोट घडविण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

अल कायदाच्या संपर्कात ?

झुबेर हंगरगेकरला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. झुबेर याच्या संगणकातून काही माहिती मिळाली आहे, तसेच त्याच्य घरातून काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. तो अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो अल कायद्याच्या संपर्कात कसा आला ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. तपासासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याची विनंती विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने त्याला चार नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×