सरन्यायधीश भूषण गवई यांचा अवमान सहन केला जाणार नाही – रमेश बागवे

सरन्यायधीश भूषण गवई यांचा अवमान सहन केला जाणार नाही - रमेश बागवे

 सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा मातंग एकता आंदोलनाच्या वतीने तीव्र निषेध

marathinews24.com

पुणे – सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला सहन केला जाणार नाही .केंद्र सरकारने तत्काळ त्या दोषी व्यक्तीवर कारवाई करावी अन्यथा मातंग एकता आंदोलनाच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलनात उभा करणार असल्याचा इशारा मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी दिला आहे.

पुरग्रस्तांसाठी पुणे पत्रकार प्रतिष्ठान धावले; मुख्यमंत्री सहायता निधीला दिली ५१ हजारांची मदत – सविस्तर बातमी 

भारत देशाचे सरन्यायधीश भूषण गवई यांच्यावर काल एका माथेफिरूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचा निषेध म्हणून आज पुण्यात तीव्र निषेध करून जाहीर निषेध सभा आयोजित केली होती. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हा हल्ला म्हणजे भारतीय संविधानावरील हल्ला आहे. या हल्ल्यामागील सूत्रधाराचा शोध गरजेचे आहे.

अशा लोकांमुळे भारत देशाची एकात्मता धोक्यात येऊ शकते त्यामुळे सदर व्यक्तीला व त्यामागील सूत्रधारास कडक कारवाई झाली पाहिजे असे यावेळी रमेश बागवे म्हणाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी सरन्यायाधीश यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करून सदर व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका मांडली .

यावेळी सरन्याधीश भूषण गवई यांच्या हल्ल्याचा निषेध करून मातंग एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाचे व निषेध सभेचे आयोजन मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले होते. यावेळी अरुण गायकवाड सरचिटणीस महाराष्ट्र, महेंद्र कांबळे रिपब्लिकन पार्टी पुणे शहर, विठ्ठल थोरात मातंग एकता आंदोलन समन्वयक महाराष्ट्र राज्य, रिपाईचे माजी अध्यक्ष महेंद्र कांबळे, फुरशीदभाई शेख रवी पाटोळे, बाबासाहेब भालेराव, इस्माईल शेख, दयानंद अडागळे सादिक लुकडे, बबलू सय्यद उपाध्यक्ष पुणे शहर, राजश्रीताई अडसूळ, महिला अध्यक्ष पुणे शहर, सुरेखा खंडाळे अध्यक्ष महिला आघाडी पुणे शहर व पुणे शहरातील व जिल्ह्यातील मातंग एकता आंदोलनाचे कार्यकर्ते महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×