Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

Crime News : भविष्य सांगण्याच्या बतावणीने तरुणाची अंगठी लंपास

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली

नारायण पेठेत ६० हजाराांची अंगठी चोरून चोरटा पसार

marathinews24.com

पुणेCrime News : भविष्य सांगणे, तसेच जीवनातील अडीअडचणी दूर करण्याच्या आमिषाने एका तरुणाच्या बोटातील ६० हजारांची सोन्याची अंगठी लांबविण्यात आल्याची घटना नारायण पेठेत घडली. याप्रकरणी एका चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाचा खुनाचा प्रयत्न; पसार झालेला सराइत अटकेत – सविस्तर बातमी

याबाबत एका तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण पेठेतील श्री माणकेश्वर विष्णू मंदिराच्या परिसरात चोरटा थांबला होता. तक्रारदार तरुण कोथरूडमधील रामबाग काॅलनीत राहायला आहे. तेथून जात असलेल्या तरुणाने चोरट्याला पाहिले. चोरटा तेथून जाणाऱ्या नागरिकांकडे भविष्य सांगण्याची बतावणी करत होता. तक्रारदार तरुण चोरट्याजवळ गेला. चोरट्याने त्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी दूर करतो, तसेच भविष्य सांगण्याची बतावणी केली. त्यानंतर चोरट्याने तरुणाला बोटातील अंगठी दाखविण्यास सांगितले.

चोरट्याने त्याच्या बोटातील अंगठी काढून देण्यास सांगितले. चोरट्याने बोटातील अंगठी काढल्यानंतर ती तोंडात टाकण्याचा बहाणा केला. तरुणाने त्याला अंगठी परत मागितली. अंगठी तुझ्या घरी कागदात गुंडाळून येईल, अशी बतावणी केले.

त्यानंतर चोरटा तेथून पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

कुलूप तोडून ऐवज लांबविला

Crime News : कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख २४ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना हडपसर भागातील मांजरी परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News :
याबाबत एकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मांजरी खुर्द भागातील श्रीराम सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी १२ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एक लाख २४ हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला. पोलीस कर्मचारी रमेश साबळे तपास करत आहेत.

दुचाकी विक्री दालनातून रोकड चोरी

Crime News : खराडी भागातील एका दुचाकी विक्री दालनातून चोरट्यांनी ६० हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार दुचाकी विक्री दालनात कर्मचारी आहे. नगर रस्त्यावरील खराडी भागात दुचाकी विक्री दालन आहे. चोरट्यांनी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील ६० हजारांची रोकड लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×