पुणे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना चाप लावण्यासाठी ‘दक्ष’ प्रणाली

अवैध व्यवसायांविरोधात पुणे जिल्ह्यात ‘दक्ष’ प्रणाली सक्रिय; या ९९२२८९२१०० नंबरवर तक्रार करण्याचे आव्हान

Marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना चाप लावण्यासाठी ‘दक्ष’ व्हाॅटसॲप प्रणाली मंगळवारपासून कार्यान्वित केली आहे. नागरिकांनी अवैध धंद्यांविषयीची माहिती ‘९९२२८९२१००’ या मोबाइल क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॅ. पंकज देशमुख यांनी केले आहे.

अवैध व्यवसायांविषयी पुणे जिल्ह्यातील नागरिक संबंधित क्रमांकावर तक्रार करु शकतात. तक्रार करण्याचे नाव आणि मोबाइल क्रमांक गोपनीय ठेवण्यात येणार आहे, ही प्रणाली स्वयंचलित, तसेच सुलभ आहे. बारामतीतील एका कंपनीने ही प्रणाली विकसित केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील बेकायदा व्यवसायांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पाऊले उचलली आहेत. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर स्वयंचलित पद्धतीने तक्रार (ॲटोमॅटिक ॲन्सर सिस्टीम) नोंदविता येईल. मटका, जुगार, वाळू उपसा, बेकायदा शस्त्रे, अमली पदार्थ यासह विविध प्रकारच्या अवैध व्यवसायाची माहिती देता येईल, असे त्यांनी नमूद केले. या प्रणालीत तक्रार दिल्यानंतर त्यावर ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्ष, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे. ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू आहे. त्या ठिकाणची माहिती दिल्यास स्थानिक पोलीस ठाण्यांना कळवून कारवाई केली जाणार नाही. या प्रणालीत तक्रार अवैध व्यवसायाची छायाचित्रे पाठवू शकतात. अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. नागरिकांनी या प्रणालीवर तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव, मोबाइल क्रमांक गोपनीय राहील, असे देशमुख यांनी सांगितले.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top