Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

दलित पँथरच्या सहसंस्थापकांनी घेतली उपसभापतीची भेट

दलित पँथरच्या सहसंस्थापकांनी घेतली उपसभापतीची भेट

भेटीदरम्यान सामाजिक न्याय, साहित्य आणि आंबेडकरी चळवळीतील सध्याच्या घडामोडींबाबत झाला विचारविनिमय 

marathinews24.com

मुंबई – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नामवंत साहित्यिक आणि दलित पँथरचे सहसंस्थापक अर्जुन ठमाजी डांगळे यांनी मुंबईत सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान सामाजिक न्याय, साहित्य आणि आंबेडकरी चळवळीतील सध्याच्या घडामोडींबाबत डॉ. गोऱ्हे आणि डांगळे यांच्यात विचारविनिमय झाला.

कॅन्सर बरे झालेले रुग्ण हे आमच्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर आणि हिरो – लेफ्टनंट जनरल पंकज पी. राव – सविस्तर बातमी 

समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी साहित्य आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवण्याची गरज यावरही यावेळी मत व्यक्त करण्यात आले. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अर्जुन डांगळे यांच्या दीर्घकालीन सामाजिक व साहित्यिक कार्याचे कौतुक करत त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. तर डांगळे यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक जाणीव निर्माण करणाऱ्या उपक्रमांचे अभिनंदन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×