Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

छळाला कंटाळून सुनेची आत्महत्या

छळाला कंटाळून सुनेची आत्महत्या

सोरतापवाडीच्या महिला सरपंचासह पती अटकेत

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील सोरतापवाडी गावच्या महिला सरपंचाच्या सुनेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सरपंच महिलेसह चौघांविरुद्ध ऊरळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सरपंच असलेल्या तिच्या सासूला आणि पतीला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेतली असून, त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

शेअर ट्रेडींगच्या आमिषाने ६१ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

दीप्ती रोहन चौधरी ( वय ३०, रा. कड वस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत दीप्तीची आई हेमलता बाळासाहेब मगर (रा. सोरतापवाडी) यांनी ऊरळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दिप्तीचा पती रोहन कारभारी चौधरी (वय ३१), सासू सुनीता कारभारी चौधरी (वय ५८, दोघे रा. सोरतापवाडी, ता. हवेली) यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप्ती व रोहन यांचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. दीप्ती संगणक अभियंता होती. तिचा पती रोहनचा आयात निर्यात व्यवसाय आहे. व्यवसायासाठी रोहन आणि त्याची आई सुनीता कारभारी तिला माहेराहून पैसे आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर दीप्तीच्या माहेरच्या मंडळींनी त्यांना अनेकदा पैसेही दिले, तसेच विवाहात ५० तोळे सोन्यासह अन्य चीजवस्तू दिल्या. विवाहानंतर मुलगी झाल्याने पती रोहन आणि सासू सुनीता निराश झाले. त्यानंतरही तिला गर्भधारणा झाल्यानंतर त्यांनी बेकायदा गर्भलिंगनिदान केले. त्यामध्ये होणारे मूल मुलगी असल्याचे समजल्यानंतर त्यांनी दिप्तीला गर्भपात करण्यास भाग पाडले. पती आणि सासू गेल्या काही दिवसापासून तिला माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा लावत होते. आरोपी तिचा शारीरिक अणि मानसिक छळ करत होते. त्यांचा त्रासामुळे दीप्ती नैराश्यात होती. चौधरी कुटुंबीयांशी तिची शनिवारी (२४ जानेवारी) पुन्हा भांडणे झाली. त्यानंतर तिने तीन वर्षांच्या मुलीसमोर दिप्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे दीप्तीची आई हेमलता मगर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे तपास करत आहेत.

प्रकाराची माहिती मिळाल्यावर शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती घेतली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दीप्तीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. या प्रकरणी ऊरळी कांचन पोलिसांनी पती आणि सासूला अटक केली. दोघांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने दोघांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×