पोलीस कारवाई होऊनही लोणी काळभोरमध्ये जुगार अड्ड्यांचे प्रमाण वाढतेच
Marathinews24.com
पुणे – शहरानजीक असलेल्या लोणी काळभोर परिसरात अवैध धंद्याना उत आला असून, जुगार अड्ड्यासह गावठी हातभट्टी दारुमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, परिसरात वारंवार कारवाई करूनही जुगार अड्डे आणि अवैध धंदे का सुरू राहतायेत, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधिताना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे.
मुंढव्यातील घरफोडीचा थरार; चोरट्यांनी चार लाखांचा ऐवज लंपास केला – सविस्तर बातमी
लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्तीसह थेउरनजीक तुपे वस्तीजवळ दोन जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन्ही कारवाईत चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ८४ हजारांवर किंमतीचे जुगार साहित्य जप्त केले आहे. तुपेवस्ती परिसरात पोलिसांनी कारवाई करीत राजेभाउ शेषराव मुसळे (वय ४०रा. थेउरगाव, हवेली) राम राजेंद्र गिरे (वय ३६ रा. गाढवेमळा, कुंजीरवाडी, हवेली ) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६० हजारांची रोकड, जुगाराचे साहित्य असा ८२ हजार ५८० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी काटेरी झुडपात पैशांवर जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच, पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
कदमवाक वस्तीनजीक लोणी स्टेशनजवळ सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ हजार ७६५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दत्तात्रय नवनाथ मोहोळकर वय ५१ रा. म्हातोबा आळंदी, हवेली आणि तात्याराम महादेव ससाणे वय ५१ रा. माळीमळा, लोणी काळभोर अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक बोबडे, उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, महेश चव्हाण, रवी आहेर, मल्हार ढमढेरे, मंगेश नानापुरे, संदीप धुमाळ, कांबळे, धुमाळ, कुंभार यांनी केली.