महाबोधी विहाराच्या ताबा मागणीसाठी पुण्यात धम्म यात्रा

बोपोडीत जंगी स्वागत

marathinews24.com

पुणे – महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी देशभरात धम्म यात्रा काढणारे भंते विनाचार्य यांनी गुरुवारी (दि.४) पुणे शहरात धम्म यात्रेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. यात्रेचे बोपोडी चौक, मुंबई-पुणे रस्त्यावर आगमन झाल्यावर माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर आणि बोपोडीतील बौद्ध बांधवांनी जल्लोषात स्वागत केले.

श्री गणेश रत्न रथातून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची विसर्जन मिरवणूक – सविस्तर बातमी

भंते विनाचार्य म्हणाले, “बौद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे श्रद्धास्थान आहे. तथागत गौतम बुद्धांना तेथेच बुद्धत्व प्राप्त झाले. हा ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे. १९४९ साली बिहार सरकारने तयार केलेला कायदा रद्द करून, विहाराचा ताबा बौद्धांना द्यावा. भारतातील सर्व राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनांना या मागणीस पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले. विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात आले नाही, तर देशव्यापी आंदोलन छेडावे लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी भंते नागघोष, भंते धम्मानंद तसेच बौद्धगया येथून आलेले अनेक भंते उपस्थित होते. कार्यक्रमात परशुराम वाडेकर यांनी भंते विनाचार्य यांचा सत्कार केला.

परशुराम वाडेकर म्हणाले, पुणे शहरात यापूर्वी आम्ही बालगंधर्व-डेक्कन चौकात हजारो बौद्ध बांधवांसह रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा दिला होता. भंते विनाचार्य यांनी वेळ दिल्यास, पुण्यात मोठ्या सभेचे आयोजन करण्यास आम्ही सर्व तयार आहोत. दरम्यान, धम्म यात्रेच्या स्वागतासाठी बोपोडीतील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पध्दतीने करण्यात आले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×