Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले अभिनंदन

नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले अभिनंदन

सी. पी. राधाकृष्णन यांच्या भारताच्या उपराष्ट्रपतीपदी झालेल्या निवडीबद्दल केले अभिनंदन

marathinews24.com

मुंबई – महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या भारताच्या उपराष्ट्रपतीपदी झालेल्या निवडीबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या अभिनंदन संदेशात “आपला दीर्घ राजकीय व प्रशासकीय अनुभव, जनसेवेसाठीचे कार्य व लोकशाही मूल्यांबद्दलची निष्ठा या गुणांमुळे देशाच्या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून केलेली आपली सेवा राज्यातील जनतेसाठी लक्षात राहणारी ठरली आहे.”

छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन पुण्यात – सविस्तर बातमी  

राधाकृष्णन हे केवळ एक प्रख्यात विद्वान, उत्तम मार्गदर्शक व उत्कृष्ट वक्तेच नाहीत, तर संसदीय व विधिमंडळ अभ्यास विषयांचे तज्ज्ञ आहेत. त्यांच्या भाषणांना उपस्थित राहण्याची आणि विविध कार्यक्रमांत ऊपसभापती या नात्याने सहभागी होण्याची संधी मला लाभली, ही माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. डॉ. गोऱ्हे यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की, “उपराष्ट्रपती या पदावर आपण आपल्या कर्तृत्व, दूरदृष्टी व सेवाभावाच्या बळावर संसद व लोकशाही प्रक्रियेला अधिक सक्षम, न्याय्य व लोकाभिमुख बनवाल, आशा शुभेच्छा दिल्या. राधाकृष्णन यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×