फेदरअन्टेल” प्रदर्शनात १३० हून अधिक दुर्मिळ पक्षी आणि वन्यजीव छायाचित्रांचे दर्शन
marathinews24.com
पुणे – भारतभर प्रवास करणाऱ्या, निसर्गप्रेमी छायाचित्रकार डॉ. पूनम शहा यांनी छायाचित्रण केलेल्या अनेक दुर्मिळ आणि मोहक पक्ष्यांच्या छायाचित्रांचे ‘फेदरअन्टेल’ प्रदर्शन दि. ३१ ऑक्टोबर ते दि. २ नोव्हेंबर कालावधीत यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन दि. ३१ रोजी सकाळी ११ वाजता माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते होणार आहे.
एसटीला दिवाळी हंगामात ३०१ कोटी रुपये उत्पन्न – सविस्तर बातमी
डॉ. पूनम शहा यांनी भारतीय उपखंडातील ९५० हून अधिक पक्षीप्रजातींचे तसेच अनेक दुर्मिळ आणि मोहक पक्ष्यांच्या छायाचित्रण केले आहे. एकल प्रदर्शनात भारतातील पक्षी आणि सस्तन प्राण्यांची १३० हून अधिक नेत्रदीपक छायाचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळात सर्वांसाठी खुले असणार आहे.





















