खडकी पोलिसांकडून आरोपी अटकेत
marathinews24.com
पुणे – दुचाकीस्वाराने चुकीच्या बाजुने प्रवास करीत कार चालकाचा रस्ता अडविला. जाब विचारत कार चालकाचे नाक मोडल्याची घटना खडकी येथील एलफिस्टन रोडवरील गुरूद्वारा समोर घडला. याप्रकरणी चौघांना खडकी पोलिसांनी अटक केली. सत्यम सुखसागर भार्गव (२९, रा. खराडी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार हे सत्यम भार्गव हे त्याच्या कारमधून खडकी येथील गुरूद्वारा परिसरातून जात होते.
पगार न दिल्याने हॉटेल मालकाचा वेटरने केला खून – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मोटारीतून प्रवास करीत असताना चुकीच्या दिशेने येऊन दुचाकीवरील दोघांनी त्यांचा रस्ता आडवला. तक्रारदारांनी त्यांना योग्य लेनमधून जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या कानाखाली मारून चेहर्यावर बुक्यांनी मारहाण केली. तसेच आरोपींनी त्यांच्या साथीदारांना बोलावुन त्यांनीrही दुचाकी तक्रारदारांच्या कारसमोर आडवी उभी केली. तक्रारदारांच्या चेहर्यावर बुक्यांनी व हातातील कड्याने मारहाण करून त्यांच्या नाकाचे हाड मोडले. तक्रारदारांना वाचविण्यासाठी आलेल्या त्यांच्या मित्रालाही आरोपींनी मारहाण केली. मारहाणीत त्यांचा खांदाही निखळला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिग्वीजय चौगले यांनी आरोपींना अटक केली.
























