रिक्षातून अंमली पदार्थाची विक्रीचा डाव उधळला

Drug trafficking plot foiled from rickshaw

तस्कराकडून साडेपाच लाखांचे मेफेड्रोन जप्त

marathinews24.com

पुणे – रिक्षात बसून अंमली पदार्थाची विक्री करणार्‍या तस्कराला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून रिक्षासह ७ लाखांचा माल हस्तगत केला आहे. मुजम्मील वाजीद खान (वय २५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून ५ लाख ३३ हजार रुपयांचा २६ ग्रॅम एमडी, १५ हजारांचे दोन मोबाईल, दीड लाखांची रिक्षा असा ६ लाख ९८ हजारांचा माल जप्त केला आहे.

कोथरूडमध्ये कचरा डेपोची दुरावस्था, नागरिक त्रस्त – सविस्तर बातमी 

अंमली पदार्थ विरोधी पथक २ सप्टेंबरला हद्दीत पेट्रोलिंग करत असताना नशेमन बिल्डिंगसमोर रिक्षात मुजम्मील खान हा साथीदारासह बसला होता. ते कोणाची तरी वाट पहात असल्याचे दिसले. पोलिसांशी त्यांची नजरानजर होताच त्याचा साथीदार जोरात सिंहगड गॅरेज चौकाकडे पळून गेला. पोलिसांनी मुजम्मील खान याला जागीच पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) सापडले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने साथीदाराने एमडी विक्री करता दिल्याचे सांगितले. त्याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार विशाल दळवी, मारुती पारधी, नागनाथ राख, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, संदिप शिर्के, विनायक साळवे, सर्जेराव सरगर, सुहास डोंगरे, दयानंद तेलंगे, विपुन गायकवाड, दत्ताराम जाधव, रेहाना शेख, खडक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस अंमलदार पांडुळे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×