कोथरूडमध्ये कचरा डेपोची दुरावस्था, नागरिक त्रस्त

कोथरूडमध्ये कचरा डेपोची दुरावस्था, नागरिक त्रस्त

कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी, माश्या व श्वसनाचे त्रास यामुळे नागरिकांना प्रचंड त्रस्त

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरूड परिसरातील कचरा डेपोमध्ये गेल्या महिन्याभरापासून तब्बल २ ते ३ हजार टन कचरा साठून राहिला असून कोणत्याही प्रकारचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर महापालिका प्रशासनाने तातडीने उपाय योजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

कृत्रिम वाळू धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा – सविस्तर बातमी 

कचऱ्याचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती आहे. कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी, माश्या व श्वसनाचे त्रास यामुळे नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. विशेष म्हणजे या डेपोच्या जवळच कोथरूड हॉस्पिटल असल्याने रुग्णांनाही याचा मोठा फटका बसत आहे. त्यापार्श्वभूमीवर “झिरो गार्बेज” या नियोजनानुसार तातडीने कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण रामचंद्र आढागळे यांनी केली आहे. तसेच संबंधित ठेकेदारांकडून काटेकोरपणे काम करून घेणे, आवश्यक गाड्या वाढवणे आणि योग्य नियोजन करणे याचीही त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×