पुणे लोहमार्ग पोलिसांनी नष्ट केले ३८५ किलो ड्रग्ज तब्बल ४४ वर्षानी अमली पदार्थ होते पडून
Marathinews24.com
पुणे- पुणे जिल्हा लोहमार्ग पोलिसांनी जप्त केलेल्या तब्बल ३८५ ड्रग्जची होळी केली आहे. दौंड लोहमार्ग पोलिस, कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिस, सोलापूर लोहमार्ग पोलिस, मिरज लोहमार्ग पोलिस अशा पाच पोलिस ठाण्याअंतर्गत रेल्वे पोलिसांनी हे अमली पदार्थ जप्त केले होते.
पुणे लोहमार्ग पोलिसांनी १९८१ ते २०२५ कालवधीतील हे अमली पदार्थ जप्त केले होते. लोहमार्ग पोलिसांकडे तब्बल ४४ वर्षानी हे अमली पदार्थ पडून होते. न्यायालयाच्या परवानगीने ते नष्ट करण्यात आले आहे. हे अमली पदार्थ महाराष्ट्र इन्व्हायरो प्रा. लि. या कंपनीमध्ये छोट्या १५ बॅग भरून भट्टीमध्ये कोळसा व विजेरी किरणांच्या साह्याने जाळुन नाश करण्यात आले.
यावेळी अमली पदार्थ रासायनिक विश्लेषण विभागातील तज्ज्ञ, अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रदुषण मंडळातील अधिकारी, शासकीय वजन व मापन कडील अधिकारी, राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी, पुणे लोहमार्गचे दोन अधिकारी उपस्थित होते. अमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार , पोलिस उपअधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार असलेले इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अमंली पदार्थ नष्ट करण्यात आले. खडकीत अमली पदार्थाचे वजन केल्यानंतर इन्व्हायरो कंपनीत नाश करण्यात आले. यासाठी ९ तास १५ मिनिटांचा कालावधी लागला.