दोन प्रवाशांना अटक
marathinews24.com
पुणे – बँकॉकहून पुण्याला येणाऱ्या दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १० कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. डीआरआय पुणे, मुंबई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी १२ मे रोजी पुणे विमानतळावर ही कारवाई केली.
बँकॉकहून पुण्याला १२ मे रोजी दोघे जण अमली पदार्थ तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती डीआरआय पुणे, मुंबई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोन प्रवाशांना अटक केली. चेक-इन केलेल्या सामानाची तपासणी केली असता, ११ हवाबंद पाकीट जप्त केले ज्यामध्ये ९ हजार ८६४ ग्रॅम हिरवट पदार्थ असल्याचे दिसून आले.
फील्ड टेस्ट किटमध्ये हा पदार्थ अमली असल्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला. त्यानंतर मुंबईत एकाच वेळी केलेल्या पाठपुराव्यात वितरकापैकी एकाला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या झडतीत ४७८ ग्रॅम चरस आणि हायड्रोपोनिक गेंड असे अंमली पदार्थ जप्त केले. १०.३ कोटी रुपये बेकायदेशीर बाजारभाव असलेले १०.३ किलो अंमली पदार्थ जप्त केले असून, आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.