Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

कोंंढवा, बिबवेवाडीत २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त

कोंंढवा, बिबवेवाडीत २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त

अमली पदार्थ विरोधी विभागाची कारवाई

marathinews24.com

पुणे – कोंंढवा, बिबवेवाडीत २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त – शहरातील कोंढवा भागात अफू बाळगणाऱ्या राजस्थानातील एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून १४ लाख ९८ हजारांची अफू जप्त करण्यात आली. तर बिबवेवाडी भागात अमली पदार्थ विरोधी विभागाने कारवाई करुन एकाकडून ११ लाखांचे मेफेड्रोन जप्त केले. कोंढवा भागात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्यावेळी मंदिराजवळ एक जण थांबला असून, त्याच्याकडे अफू असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी सचिन माळवे यांना मिळाली.

माईलस्टोन हॉलीडेजच्या संचालकांवर गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

सापळा लावून पोलिसंनी भागीरथराम रामलाल बिष्णोई (वय ४६, रा. टिळेकरनगर, कोंढवा) याला पकडले. त्याच्याकडून १४ लाख ९८ हजार रुपयांची अफू, पिशवी, इलेक्ट्राॅनिक वजनकाटा असा १५ लाख चार हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बिष्णोई याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. तसेच बिबवेवाडी भागात अमली पदार्थ विरोधी पथकाने आणखी एक कारवाई केली.

कारवाईत पोलिसांनी तस्कराकडून ११ लाखांचे मेफेड्रोन जप्त केले. विठ्ठल ऊर्फ अण्णा रघुनाथ कराडे (वय ५७, रा. बिबवेवाडी) याच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती आझीम शेख यांना मिळाली़ पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. ११ लाख २ हजार रुपयांचे मेफेड्रोन, इलेक्ट्राॅनिक वजनकाटा, मोबोइल संच असा ११ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार,सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस कर्मचारी योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेबाड यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×