माईलस्टोन हॉलीडेजच्या संचालकांवर गुन्हा दाखल

Pune : विद्युत मोटार चोरट्यांचा धुमाकूळ

कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – माईलस्टोन हॉलीडेजच्या संचालकांवर गुन्हा दाखल – शोसाठी आंतराष्ट्रीय आणि राष्ट्रीय तिकीटांचे बुकींग केले असताना २६ लाख ८१ हजारांची खोटी बिले तयार करून १३ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी माईलस्टोन हॉलीडेज प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकासह तिघांवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील दोन आरोपी अटकेत – सविस्तर बातमी 

माईलस्टोन हॉलीडेजचे संचालक तेजस शशिकांत वैष्णव (२२), संचालक मधुमती शशिकांत वैष्णव (दोघेही रा. वीरभद्रनगर, बाणेर)आणि उत्कर्षा सतिश आंजळकर (१९, गडकर आळी, शाहुपुरी सातारा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत विवेक दत्तात्रय पवार (४४, वनराजी अपार्टमेंंट, एमआयटी कॉलेज रोड, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २२ मार्च ते जुलै २०२५ दरम्यान हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवेक पवार यांनी त्यांच्या शासेसाठी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय तिकीटांचे बुकींग केले होते. बुकींगची २६ लाख ८१ हजार ४०० रूपये होत असताना आरोपींनी संगणमत केले. त्यांनी खोटी बिले तयार केली. तसेच अमेरीकेतील कलाकारांचा व्हिसाचे काम वेळेत न करून त्यांची तिकीटे बुक केली नसताना बीलामध्ये तिकीटे बुक केल्याचे भासवून कॅन्सलेशनच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम स्विकारून १३ लाख ४० हजार ७०० रूपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ३० लाख ८० हजारांची फसवणूक

इंजिनिअरला शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी तब्बल ३० लाख ८० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका ४७ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

तक्रादार हे बावधन येथील एक्स्टाइृन इंजिनिअर्स कंपनीत नोकरीस आहेत. तर ते गोकुळनगर येथे गेली १९ वर्षापासून राहण्यास आहेत. तक्रारदार हे मागील वर्षी जुलै महिन्यात आपले टेलिग्राम अकाउंट चेक करत असाना त्यांना शेअर्स मार्केट संदर्भातील लिंक दिसल्या. तसेच त्यावर त्यांना नफा होत असल्याचे इतरांचे मेसेज वारंवार पडत होते.

त्यानुसार तक्रारदारांनी ही शेअरमार्केटमध्ये गुंतवुणक करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी ३० लाख ८० हजारांची गुंतवणुक केली. त्यानंतर तक्रारारांनी रजिस्टर केलेल्या अकाउंटला ३ कोटी १४ लाख ७४ हजार रूपये दिसून आले. त्या पैशापैकी १० हजार तक्रारदरांनी काढण्याचा पयत्न केला परंतु, त्यांना त्यांचे पैसे काढता आले नाही. त्यानंतर संबंधीत आरोपीला तक्रारदाराने फोन लावला असता त्याने तुमचे डीमॅट खाते बंद झाले आहे असे सांगितले. दरम्यान तक्रारदारांना आपली फसवणूक झाली असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

तर दुसर्‍या गुन्ह्यात एका मोठ्या कंपनीत सीनिअर एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी करत असलेल्या महिलेला रेस्टोरंट ला रिव्ह्युव्ह तसेच फॉरेक्स ट्रेडिंगचे टास्क पूर्ण करण्यास सांगत चांगला नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने १० लाख ६५ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ३४ वर्षीय महिलेनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिसऱ्या गुन्ह्यात

टास्क पुर्ण केल्यावर परतावा मिळतो असे प्रलोभन दाखवून ज्येष्ठ नागरिकाची २ लाख ५२ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विनोदकुमार रविंद्रप्रकाश अगरवाल (६५, रा. बोपोडी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २० मे ते २६ मे दरम्यान घडला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top