Breking News
विद्यार्थिनींचा छळ म्हणजे संवेदनहिनतेचं भयंकर उदाहरण- डॉ. नीलम गोऱ्हेअण्णाभाऊ साठे साहित्यभूषण पुरस्काराने विक्रम शिंदे सन्मानितधर्मवीर गडावर संभाजी महाराजांची सृष्टी उभारावीआई-मुलाच्या नात्यावर फुंकर घालणारे ‘पेरले’ गीत रसिकांच्या भेटीलाCrime News : शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीचे आमिष पडले ४० लाखांनाPune – नवले पुलाजवळ अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशी ठारआई-बाबांवरील रागाने तिने गाव सोडले; पण पुणे पोलिसांमुळे आयुष्य वाचलेआर्थिक शिस्तीचे पालन करीतच राज्याचा अर्थकारभार-उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे शहरातील गुन्हेगारीत प्रचंड वाढयूपीएससी-२०२४ यशस्वितांचा सत्कार सोहळा १२ जुलैला

मद्यपी मोटार चालकाची पोलिसांशी अरेरावी, तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

लष्कर भागात कारवाई, वाहन चालकाकडे रिव्हॉल्वर सापडले

marathinews24.com

पुणे – नाकाबंदीत मद्यपी मोटार चालकाने तपासणी करण्यास नकार देऊन पोलिसांशी अरेरावी केली. कारवाईस विरोध करुन तपासणी करणार्‍या पोलिसांसमोर गळफास घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे रिव्हॉल्वर सापडले आहे. लष्कर भागात ही घटना घडली असून, याप्रकरणी मोटारचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशाला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घातल्या बेड्या – सविस्तर बातमी

अरुण निवृत्ती सूर्यवंशी (वय ५०, रा. सेक्टर नं. ८, एरोली, नवी मुंबई), बाबुराव धर्माजी आंबेगावे (वय ५५, रा. सोमराणा ता. उदगीर, जि. लातूर), लक्ष्मण प्रल्हाद पाटील (वय ३९, रा. रिव्हर व्ह्यू सोसायटी, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) अशी गुन्हा दाखल केलेल्यंची नावे आहेत. पोलीस कर्मचारी विजय राम सुतार यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागातील पूलगेट पोलीस चौकीसमोर रविवारी दि.२९ मध्यरात्री पोलिसांनी नाकाबंदी करुन वाहन तपासणी सुरु केली होती. त्यावेळी सूर्यवंशी आणि त्याचे मित्र आंबेगावे, पाटील हे पूलगेट परिसरातून मोटारीतून जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांची मोटार थांबविली असता, मोटारचालक सूर्यवंशी आणि मित्रांनी मद्यप्राशन केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांची चौकशी करून तपासणी सुरू केली. तेव्हा सूर्यवंशी आणि मित्रांनी कारवाईस विरोध करुन पोलिसांशी अरेरावी केली. भर रस्त्यात त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात करीत मध्यरात्री सार्वजनिक शांततेचा भंग केला.

पोलिसांना शिवीगाळ करुन मी रस्त्यात गळफास घेऊन आत्महत्या करेल, अशी धमकी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली. तेव्हा त्याने कंबरेत रिव्हॉल्वर खोचल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सूर्यवंशी हा ठेकेदार असून, त्याच्याकडे शस्त्र परवाना आहे. त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top